infertilityayurved

Author name: infertility Ayurved

Uncategorized

गुडीपाडवा

गुडीपाडवा गुडीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे नवीन उद्योगाचा,व्यवसायाचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा आरंभ करण्यास हा मुहूर्त शुभ मानला जातो. गुढीपाडव्याला नवीन वर्ष म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. हाच वर्षांरंभाचासुद्धा दिवस असल्यामुळे खगोलीय गणितानुसारदेखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे. गुढीपाडवा साजरा करण्याचे कारण याचे उत्तर दडले आहे शालीवाहन राजवटी मध्ये! शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. या दिवशी पंचाग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस. याच दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे. गुढी कशी सजवतात? तसं तर प्रत्येक प्रांतानुसार गुढी सजवायची पद्धत वेगळी असते. पण सामान्यत: एक समान पद्धत सुद्धा दिसून येते. ज्यानुसार नवीन वर्षाचे स्वागत म्हणून एका उंच काठीला रेशमी साडी व भरजरी खण घेऊन त्याची घडी बांधली जाते. नंतर त्या काठीवर चांदीचा वा अन्य धातूचा तांब्या उपडा ठेवला जातो. आंब्याची पाने व कडूनिंबाची डहाळी देखील त्यावर बांधून गुढी अधिक सुंदर सजवली जाते. शेवटी फुलांचा हार आणि अत्यंत विशिष्ट अशी साखरेच्या गाठीची माळ चढवली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब घालून बनवलेल्या मिश्रणाचे महत्त्व गुढीपाडव्याच्या प्रसाद म्हणून कडूनिंबाची पाने-मोहर, धणे आणि गुळ यांचा विशेष योग तयार करण्याची पारंपारिक प्रथा आहे. यामध्ये गुळ हा चवीने गोड आणि गुणाने उष्ण असल्याने शरीरातील दुष्ट कफाचा नाश करून शरीरस्थ जठराग्नी सुस्थितीत राखायला मदत करतो. पातळ झालेल्या दुष्ट कफामुळे शरीरात अनेक प्रकारच्या कृमींची उत्पत्ती होते. या स्थितीत कृमीनाशक, कफदोषशामक, रक्तशोधन करणार्‍या गुणांचा कडुनिंब वापरण्याचा शास्त्रादेश असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. धणे हे पित्तशामक, दाहशामक, शरीराला थंडावा देणारे आहे .गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब आणि अन्य पदार्थ एकत्रित करून मिश्रण सिद्ध (तयार) केले जाते. या दिवशी मिश्रणासाठी कडुनिंबाचाच वापर करण्यामागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.जो यजमान आहे त्याला ते रोगशांती, व्याधींचा नाश व्हावा आणि सुख, विद्या, आयुष्य, लक्ष्मी (संपत्ती) लाभावी म्हणून भक्षण करण्यास सांगितले आहे.कडुनिंब घालून बनवलेले मिश्रण ग्रहण केल्यावर मुखाद्वारे चैतन्याचा प्रवाह देहात प्रक्षेपित होतो.. !!गुडीपाडव्याच्या आरोग्यदायी शुभेच्छा !!   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Uncategorized

डोळ्याखाली काळे सर्कल

डोळ्याखाली काळे सर्कल डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं तरूण वयात वयस्कर बनवतात. या काळ्या वर्तुळांमुळे समोरच्याला तुम्ही थकलेले किंवा आजारी भासतात.यांनाच डोळ्याभोवती काळी वर्तुळे, Periorbital circles ,Under eye circles ,Dark circles असे ही म्हणतात.मेकअपनं काळी वर्तुळ झाकता येत असली तरी हा त्याच्यावरचा परीपुर्ण उपाय नव्हे. डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळे जाण्यासाठी नियमित उपचार करावे लागतात. अर्थात उपचाराचा परिणाम दिसण्यासाठी खूपच संयम ठेवावा लागतो. आता आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने या समस्येचा विचार करु या. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे वात व पित्त दूषित होऊन स्थानसंश्रय भेदाने डोळ्याच्या त्वचेखाली वैवर्ण्य किंवा गडदपणा निर्माण होतो. आपल्या डोळ्यांच्या खाली व गालांच्या वर जी त्वचा असते, ती खूप नाजूक आणि कमालीची पातळ असते. त्या त्वचेला रक्तपुरवठा करणार्‍या खूप सूक्ष्म अशा केशवाहिन्यांचे एक जाळे त्यामध्ये असते. त्या केशवाहिन्यांमधून रक्त वाहताना त्यांच्या बाह्य आवरणातून काही लाल रक्तपेशी बाहेर पडतात आणि त्वचेखाली जमा होतात. केशवाहिनीच्या बाहेर पडलेल्या या पेशी मृत पावतात. त्या ठिकाणी काही किण्वक रस निर्माण होतात आणि रक्तपेशींचे विघटन होऊ लागते. विघटित होताना या लाल रक्तपेशीतून एक निळसर काळे रंगद्रव्य निर्माण होते. त्याच्या रंगामुळे ही नाजूक त्वचा काळी दिसू लागते.ही वर्तुळ येण्याची कारणे. *हर्मोन मधील बदलामुळे स्त्रीयांना मासिक पाळीच्या वेळी हे बदल होतात.*आपणास एखाद्या विशिष्ट गोष्टीची अँलर्जी वारंवार होत असेल तरीही ही वर्तुळ येतात.*लिव्हर संबंधित आजार कावीळ असल्यास ही हे बदल होतात.*अशक्तपणा, अँनिमिया, पंडूरोग अथवा शरीरात झपाट्याने कमी होणारी आयरनची मात्रा अथवा या आजारामुळे ही आयरनची मात्रा कमी होऊन परिणामी डोळ्याखाली डाग येतात.*व्हिटॅमिन चा अभाव शरीरात अ’, ‘क’, ‘ई’ आणि ‘के’ जीवनसत्वे योग्य प्रमाणात नसल्यास ही वर्तुळे येऊ शकतात.*घरात अनुवंशिकतेमुळे ही अशी वर्तुळ दिसतात.*वाढत्या वयोमानानुसार ही काळी वर्तुळ दिसतात.*कायमस्वरूपी सर्दी होत असेल तरीही या भागातील नसा हळव्या होऊन हा त्रास होऊ शकतो.*बर्याच कालावधी पासून शरीरात चर्मरोग तरीही वर्तुळ तयार होतात.*सतत रडल्याने ही समस्या निर्माण होते.*आहारात मिठाचे प्रमाण अधिक असल्यास ही समस्या जन्म घेते.*कमी पाणी प्यायल्याने देखील ही समस्या निर्माण होते या केसमध्ये घातक विषक्त पदार्थ बाहेर न पडल्याने समस्या निर्माण होते.*रक्तातील हिमोग्लोबीन कमी झालं असल्यास काळी वर्तुळं येतात.*अपुरी झोप,सततची चिंता,भिती, तणाव,अतीविचार यामुळे ही समस्या तयार होते.*अधिक काँप्युटर, मोबाईलचा वापर.*योग्य चौरस आहाराचा आभाव जंकफूड,सर्व भाज्या न खाणे आवडनिवड अधिक.*पोटसाफ नसणे,सतत बध्दकोष्ठ, गँसेस,सतत धावपळ या गोष्टी सुध्दा या समस्येला जन्म देतात.*कच्चे अथवा कमी शिजवलेले मटण खाल्यामुळे हे इनफेक्शन होते यालाParasite infection इनफेक्शन असेही म्हणतात.यामुळे डोळेसूजतात,डोळ्यांच्या त्वचेचा रंग बदलतो व डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येतात.*कधीकधी थायरॉईड हॉर्मोन्सच्या अभावामुळे डोळ्याच्या टिश्यूजमध्ये पाणी जमा झाल्याने काही लोकांच्या डोळ्याखालील त्वचेचा रंग गडद होतो.*किडनी मध्ये बिघाड झाल्यास त्वचेखाली द्रवपदार्थ साठू लागतात.त्यामुळे या विकाराचे प्रथम लक्षण सूजलेले व काळी वर्तुळे निर्माण झालेले डोळे हे असू शकते.*जवळचे किंवा लांबचे पाहताना त्रास होत असल्यास, समोरचे पाहताना डोळ्यांवर ताण येत असल्यास डोळ्यांभोवती काळी वर्तुळे निर्माण होतात.*अॅमलॉईड या प्रोटीनच्या जमा होण्याने ही समस्या निर्माण होते.कधीकधी काही रुग्णांमध्ये यामुळे त्वचेतून रक्त देखील येऊ लागते.या स्थितीत डोळ्यांच्या पापण्यांखालील छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमा झाल्याने त्वचेवर गडद रंगाचे चट्टे दिसतात अथवा काळे डार्कसर्कल तयार होतात यालाAmyloidosisअसे ही म्हणतात.*डोळ्याच्या पापण्या व आजूबाजूच्या भागाला हे इनफेक्शन व दाह झाल्यामुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळे येतात.या स्थितीला Periorbital cellulitis असेही म्हणतात. *** *आहार *** संतुलित आहाराला प्रथम प्राधान्य द्यावे. कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न असलेला आहार, त्याचबरोबर जास्त फायबरयुक्त आहार व आहारात पालेभाज्यांचा वापर करावा. दूध व तुपाचे रोज सेवन करावे. फलाहार घ्यावा. तेलकट,अर्धकच्चे भोजन,अती जड पदार्थ ,तिखट पदार्थ अतिप्रमाणात सेवन करू नये. शरीर रूक्ष होऊ नये म्हणून रोज आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. यावरील घरगुती उपाययोजना *चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवा. सकाळी धुऊन टाका. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.*बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्यांखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा.*पदिना वाटून त्यामध्ये लिंबाचा रस टाकून काळ्या वर्तुळांना लावावा व पंधरा ते वीस मिनिटांनी पाण्याने धुवून टाकावे.*बाटाटा व काकडीचा रस काढून त्या रसात कापसाचे बोळे बुडवून ते पंधरा मिनिटे बंद डोळ्यांवर ठेवावेत.गुलाबपाण्यात कापसाचे बोळे बुडवून दोन्ही डोळ्यांच्या पापण्यांवर झोपताना नियमित ठेवावेत.*एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (काही थेंब) एकत्र करून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्यांखाली लावावे. दोन मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर थंड पाण्याने डोळे धुवून काढावे.*जायफळ चांगले पाण्यात उगाळून काळ्या वर्तुळांना रात्री झोपताना लावावे*चहाचा चोथा थंडकरुन याने हलकेच डोळ्याखाली मसाज करा.याने छान स्क्ररबींग होऊन रक्तपुरवठा सुरळीतपणे होऊन ही समस्या दुर होईल.*काकडीची गोल काप करून दिवसातून दोन ते तीन वेळा १o मिनिटे डोळ्यांवर ठेवा.*कोरफडीचा गर काढुन किंचित हळद घालून नियमितपणे लावावा.*खोबरेल तेल, एरंड तेल मिक्स करुन लावावे.* कुंकुमादि तेल, दूध, हळद, केशर, ग्रीन टी एकत्रित पेस्ट करून लावावे हलका मसाज करावा. औषधी उपाययोजना औषधांमध्ये गंधक रसायन, आमलकी रसायन, आवळा मुरब्बा, च्यवनप्राश, सारीवाद्यासव, खदीरारिष्ट, मंजिष्ठा, आरोग्यवर्धिनी.तसेच अनेक औषधांचा वापर वैद्याच्या सल्याने करता येतो. * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Thyroid

थायरॉईड (Thyroid)आणि आयुर्वेद

थायरॉईड (Thyroid)आणि आयुर्वेद थायरॉईड (Thyroid) आजकाल सामान्य पणे सगळीकडे आढळणारा आजार म्हणजे थायरॉईड म्हणू शकतो आपण.थायरॉईड म्हणजे शरीरामधील संप्रेरके/हॉर्मोन तयार करणे हे मुख्य काम आहे. हेच हॉर्मोन तयार करण्याचे काम जेव्हा कमी किंवा जास्त प्रमाणात होते त्याला थायरॉईड आजार म्हणू शकतो. त्याचे hyper आणि hypo थायरॉईडीसम असे प्रकार करू शकतो.थायरॉईड ही एक छोटी ग्रंथी gland आहे, जी मानेच्या समोर घश्याच्या मागच्या भागात असते, त्याचा आकार हा फुल पाखरा सारखा असतो .थायरॉईड चे काम बिघडले तर त्याचा परिणाम हा संपूर्ण शरीरावर झालेला दिसतो. थायरॉईड कोणाला होऊ शकतो-1. अनुवंशिकता असेल घरा मध्ये2. अनेमिया ची जुनी हिस्टरी असेल तर.म्हणजे शरीरामध्ये रक्ताचे Hb चे प्रमाण कमी असल्यास3. Type-1 डायबीटीस मध्ये4. जुना वात विकार असतील तर5. Iodine जास्त असलेले औषधी घेतल्यामुळे Hyper Thyroidisum-लक्षणे-Anxiety,भीती वाटणे,मूड सतत बदलणे, Palpitation-सतत धड धड जाणवणे,निद्रानाश,वजन कमी होणे,Constipation,मलबध्दता,Irregular Peroids,Goiter ग्रंथी ची वाढ होणे Hypo thyroidisum ची लक्षणे-थकवा येणे,वजन वाढणे,विसारभोळे पणा वाढणे,Peroid मध्ये अंगावरून खूप जाणे,dry hair,आवाजात बदल घोघरा होणे. Blood test-thyroid function test करावी.T3,T4,TSH लेव्हल चेक केले जातात. Diet आहार-खाणे टाळावे-अपथ्यकोबी, फ्लॉवर, ब्रोकोली,बाजरी, रागीसोयाबीन चे पदार्थ, सोया milk,कॉफी टाळावी.Almond,बदाम,शेंगदाणे. काय खावे-पथ्य हे पदार्थ सतत खाण्यात असावेत-Fish मासेMango आंबेBanana केळी रोजसुके खोबरेकुळीथ व्यायाम-सूर्यनमस्कार रोज घालावेत.Weight training चे व्यायाम करावेत-घाम गळे पर्यंत व्यायाम करावा.आयुर्वेद आणि थायरॉईड-थायरॉईड हा कफज व्याधी सांगितलाआहे,त्याचे स्थान सुद्धा कफ भागात आहे.यामुळे वमन ही सर्वोत्तम चिकित्सा आयुर्वेदाने संगीतली आहे. वमन नंतर थायरॉईड ग्रंथीचे काम पूर्ववत होण्यास मदत होते.थायरॉईड च्या रिपोर्ट्स मध्ये एका वमनाने खूप बदल दिसून येतात. वमन मध्ये दूषित कफ दोष बाहेर काढला जातो. कांचनार गुगुल, त्रिफळा गुगुल सारखे कल्प आयुर्वेदामध्ये आहेत,ज्याने थायरॉईड कमी होण्यास मदत होते. औषधी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावीत.पूर्वी ह्या आजाराचे प्रमाण कमी होते, परंतु आता ते प्रमाण वाढले आहे, लहान मुलांमध्ये सुद्धा जाडी वाढून थायरॉईड ची लक्षणे दिसू शकतात.. त्यासाठी समतोल आहार आणि रोजचा व्यायाम हाच उत्तम आरोग्याचा मंत्र असेल.   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44   Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Arthritis

सांधेदुखीवर घरगुती उपाय

सांधेदुखी ज्येष्ठ नागरिकांकडून सर्वसाधारणपणे नेहमीच एक तक्रार केली जाते,ती म्हणजे गुडघा दुखीची आणि गुडघा वाकवता न येण्याची.सध्या तरुणांमध्येही सांधेदुखीचं प्रमाण वाढत असून,ती सर्वांसाठी त्रासदायक ठरत आहे. सांधेदुखीमुळे होणाऱ्या वेदनांमुळे व्यक्तीच्या हालचालींवर मर्यादा येतात.या मर्यादांमुळे त्याच्या दैनंदिन कामावर थेट परिणाम होतो. त्यामुळे या विकाराची लक्षणं,त्याचं निदान, त्याच्या उपचारांची प्रक्रिया व हा त्रास होऊच नये म्हणून घ्यायची काळजी आणि या वेदनेतून मुक्त होऊन आरोग्यमय आयुष्य कसं जगावं,हे आपण बघुयात . कारणं आणि लक्षणं सांधेदुखीचं मुख्य लक्षण म्हणजे गुडघ्याभोवती असलेल्या कुर्चा ( कार्टिलेज ) झिजतात.त्यामुळे गुडघ्याची गादी कमी होते.यामागे विविध कारणं असतात,जसं की अनुवंशिकता,गुडघ्यावर सतत अतिरिक्त ताण येणं,स्थूलपणा,अयोग्य अशी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव. प्रत्येकाला गुडघेदुखीचा त्रास असतोच; पण सांधेदुखीचं गुडघेदुखी हे एकमेव लक्षण असू शकत नाही. गुडघेदुखी बरोबरच गुडघा वाकवता न येणं, त्यावर सूज येणं, सरळ चालताना तो दुखणं, चालताना कुर्चा दुखणे आणि सातत्यानं होणारी गुडघेदुखी हि सारी लक्षणं झीजेची असू शकतात. त्यामुळे अशा वेळी त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. आरोग्यदायी जीवनशैली जगा: बैठं काम असलेल्या जीवनशैलीमुळेही तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास निमाण होऊ शकतो.त्याचप्रमाणे व्यायामाचा अभाव, जास्त वजन, जंक फूड खाण्यामुळं तुमचा गुडघा कमकुवत होऊन त्याची हानी होऊ शकते. त्यातून कुर्चेचा स्तर कमी होत जातो. गुडघ्यातल्या कुर्चाची झीज झाल्यानंतर ती पुन्हा भरून येऊ शकत नाही.थोडक्यात आपली जीवनशैली कशी आहे,त्यावर गुडघ्यातील कुर्चाचं काम ठरत असतं. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनशैलीत बदल करून गुडघेदुखी दूर ठेवता येऊ शकते. उपचारांचे पर्याय: शरीरातील सांधेदुखीचे प्रमाण वाढल्यावर शरीरातील हालचालींवर मर्यादा येतात. वेदनाशामक औषधांमुळे केवळ तात्कालिक कालावधीसाठी वेदनेपासून मुक्तता मिळते;पण गुडघादुखीवर ही औषधं कायमस्वरुपी उपाय म्हणून गृहीत धरू नये. १. तीळ तेल कोमट करून त्याने गुडघ्यांची मसाज करू शकता किंवा महानारायण तेल कोमट करून मसाज करावे. गरम शेक घ्यावा यामुळे गुडघ्याला गतिशीलता आणि लवचिकता येते. २. गुडघ्यांची झीज होत असेल तर “जानूबस्ती” म्हणजे गुडघ्यांच्या भोवती पिठाचे पाळे करून औषधी तेल मुरवणे हे श्रेष्ठ उपचार आहेत. ३. लाक्षादी गुग्गुळ हि गोळी सकाळी १ आणि रात्री १ घ्यावी . ४. आहारातून कॅल्शियम ची कमतरता पूर्ण करावी. जर याने आराम नाही मिळाला तर जवळच्या आयुर्वेदीक तज्ञाची भेट घ्यावी . * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 शाखा-मुंबई-१) कोपरखैरणे २) दादरपुणे -१) निगडी २) बाणेर ३) मोशी. Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Uncategorized

कास्याच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा?

कास्याच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा? आपल्याकडे आयुर्वेदावरील ग्रंथामध्ये “पादाभ्यंग” सांगितलेले आहे त्यात कास्याच्या वाटीने पायाला गायीचे तूप किंवा खोबरेल तेल चोळणे हा प्रमुख उपचार सांगितला आहे त्याचे फायदे खालीलप्रमाणे:- ◆ शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी◆ शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी◆डोळ्याच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी◆शरिरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढविण्यासाठी◆मधुमेहामुळे होणाऱ्या पायाच्या संवेदना कमी होण्यासाठी◆निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी◆पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी◆गुढघेदुखी, टाच दुःखी, कंबरदुखी अशा त्रासाचे प्रमाण कमी करण्यासाठी◆पायावरची सूज कमी करण्यासाठी◆तळव्याला भेगा पडणे तसेच पायाची जळजळ होणे या समस्या कमी करण्यासाठी◆व्हेरिकोज व्हेन्स वर उपयुक्त◆डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यासाठी◆चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी भावप्रकाश या ग्रँथात म्हटले आहे “कांस्यम बुद्धीवर्धकम”आपल्या मराठीत एक म्हण आहे ” तळपायाची आग मस्तकात जाणे” आणि ती अक्षरशः खरी आहे तळपायाला कास्याच्या थाळीने मसाज केल्याने डोके शांत का होते याचे उत्तर या म्हणीत सापडते.वात जे अनेक रोगांचे मूळ आहे त्याचे शमन करून मर्यादित ठेवण्यासाठी हा उपचार अतिशय परिणामकारक असल्याचे अनुभवास आले आहे, युरोप व अमेरिकेमध्ये तर भरपूर पैसे मोजून लोक ही ट्रीटमेंट घेत असतात. संस्कृतमध्ये 1 श्लोक आहे ज्यात म्हटलं आहेजो मनुष्य झोपण्यापूर्वी पायांना मसाज करतो त्याच्यापासून रोग असे दूर राहतात जसे गरूडपासून साप .आपल्या शरीरात 72000 नाड्या आहेत त्यातल्या बऱ्याच नाड्यांचा शेवट हात आणि पायाच्या तळाव्यात होतो त्यामुळे तळव्याचा मसाज हा अनेक दुखण्यावरचा एक गुणकारी व कमी खर्चाचा उपाय आहे.ऐतिहासिक वारसाकांस्य हा धातू आपल्याला फक्त सुवर्ण आणि रोप्य पदकांसोबत कांस्य पदक देतात म्हणून माहिती आहे. भारतात बहुतेक प्रांतामध्ये लग्नामध्ये मुलीला कास्याची वाटी देण्याची प्रथा दिसून येते पण तिचा उपयोग मात्र कमीच केला जातो. कासे हा तांबे आणि जस्त यांचा संमिश्र धातू असून आयुर्वेदाने त्याचा उपयोग शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी म्हणून 5000 वर्षांपूर्वीपासून सांगितलेला आहे. गुजरातमध्ये जेवणासाठी कास्याच्या थाळ्याच वापरतात, पूजेसाठी कास्याचे तबक वापरले जाते, मंजुळ आवाजासाठी मंदिरातल्या घंटासाठीही कासेच वापरले जाते, तसेच काठिण्य व ऑक्सिडेशन न होण्याच्या गुणधर्मामुळे तोफा बनविण्यासाठी हा धातू वापरला जात असे, पूर्वी रशियामध्ये चर्चघंटा, तर स्पेन आणि पुर्तुगालमध्ये तोफा या धातूच्या बनवीत असत.वातव्यधीहरम कफप्रशनम कांतीप्रसादावहम त्वगवेवर्ण्य विनाशनम रुचिकरमम सर्वांग दाढर्याप्रदम आग्नेरदीप्तीकर्मम बलोपजननं प्रस्वेद मेदोप महं पदभ्याम मर्दनमुदिशनती मूनया: श्रेष्ठम सदा प्राणायामम्हणजे ऋषि मुनी सांगतात की पायाला तेल किंवा तुपाने मसाज करणे कफनाशक आहे.सुवर्णासमान कांती प्रदान करणारे, त्वचेचा वर्ण गौर करणारे, अग्नी प्रदीप्त करणारे, बलकारक, मेद-स्वेद कमी करणारे,आणि रुचिकारक आहे .   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

blog

आवळा खाण्याचे फायदे

आवळा खाण्याचे फायदे ### आवळा…आमलकी….आयुर्वेदात आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानले आहे. संस्क्रृतमध्ये-आमलकी, व इंग्रजित-एम्ब्लिका मायरोबेलान असे म्हणतात.. आवळा हा शरीर पोषणाचं काम करतो म्हणून आयुर्वेदात याला .. “धात्रि”म्हणतात.. वार्धक्य अवस्था टाळुन चिरतरुण ठेवतो म्हणून याला “वयस्था” असेही म्हणतात.. आवळा हा रक्तदोषहारक, पित्तशामक,सारक व रूचकर आहे..…. ..###आवळा हा आम्ल-मधुर रसाचा, शीत-वीर्यात्मक व मधुर विपाकी असल्याने शरिरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. रक्तविकारात उदा.-नाकाचा घोळणा फुटला असेल तर,शौचातुन रक्त जात असेल तर, मूळव्याधितून रक्त जात असेल तर,तसेच स्रियांच्या मासिक पाळीत अतिरक्तस्राव होत असेल तर. आवळाचूर्ण , आवळारस घेतल्यास आराम पडतो..।। आयुर्वेद।।…🍈 जर डोकेदुखीचा त्रास असेल तर, आवळ्याच चूर्ण, तूप व खडिसाखर समप्रमाणात घेऊन सकाळी अनशापोटी घ्यावे.त्वरित आराम पडतो. केसांच्या तक्रारीवर उदा.. केस गळण,पांढरे होणे, कोंडा होणे,टक्कल,केस रूक्ष होणे या सर्वावर आवळा,शंखपुष्पी,जास्वंद, यानीयुक्त तेल केसांना लावावे.. काही दिवसातच केसांची वाढ होते, केस गळण थांबत व केसांचा रंग टिकतो.. व रात्रि शांत झोप येते..तोंड बेचव होऊन मळमळ किंवा उलटी होत असल्यास आवळ्याचा रस व मध याचे चाटण घ्यावे.तोंडास रूचि येते..###आवळा,हिरडा,बेहडा,जांभूळ बी,कडुलिंबाच चूर्ण,गुळवेल व कारली सुकवून त्यांची पूड समप्रमाणात घेतल्यास .. मधुमेह हा आजार आटोक्यात राहतो.. हे चूर्ण सकाळ संध्याकाळ रूग्णाने १-१ चमचा घ्यावं.. नियमित आवळा सेवन केल्यास शरिरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते व त्यामूळे कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी राहून ह्रुदयविकार टाळता येतो..।। आयुर्वेद।।🍈..पोटात जंत झाल्यास एक चमचा आवळ्याचा रस व एक चमचा ओल्या नारळाचे दूध एकत्र करून जेवणापूर्वी, १:५ महिना घेतल्यास जंत पडतात.आव,जुलाब, अपचन या विकारावर,आवळ्याच्या रसात सुंठ पुड घालून ते चाटण दोन्ही जेवणापूर्वी १ महिना घ्यावे.एका आवळ्यातील जीवनसत्व ४० संत्र्याची बरोबरी करतं.एक आवळा रोज खाल्याने रक्तवाहिन्या मजबूत होतात. उन्हामूळे डोळ्यांची आग होते.डोळे थकतात, अश्या वेळी आवळ्याच्या बियांच्या काढ्याने जर डोळे धुतले तर डोळे सशक्त,निरोगी होतात..आवाज बसला असेल तर आवळ्याचे चूर्ण मधात मिसळून घ्या.उचकी किंवा श्वास लागत असेल तर आवळ्याचा रस व पिंपळाचे चूर्ण एकत्र करून घेतात.खरूज झाल्यास आवळकाठी जाळुन ती तेलात खलून त्याचा लेप फोडांवर लावावा..चेहर्यावर सुरकुत्या पडु नये म्हणून आवळकाठी पाण्यात वाटुन ती चेहर्याला लावावी.।। आयुर्वेद।। 🍈 वातामूळे होणार्या सांधेदुखीत एक चमचा आवळा चूर्ण व एक चमचा गुळ एकत्रित करून आल्याच्या रसासोबत घेतल्यास आराम पडतो..आवळा,हिरडा,बेहडा ही द्रव्ये समप्रमाणात घेऊन याचे चूर्ण बनवतात. यालाच त्रिफळा चूर्ण म्हणतात.. हे रोज पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी गाळावे व याने डोळे धुवावे.याने डोळ्याचे तेज वाढतं.. तसेच रात्री झोपतांना गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण घेतल्यास सकाळी शौचास साफ होते.……..नियमितपणे आवळा सेवन केल्यास. त्यात असणार्या रोगप्रतिकार शक्ति मूळे ह्रदय,केस,मांसपेशी व शरिरातील अनेक ग्रंथिंना बळ मिळून माणुस तरूण राहतो. म्हणुनच वार्धक्यावस्था टाळण्यासाठी च्यवनऋषिंनि आवळ्यापासून बनवलेला च्यवनप्राशावलेह सेवन केला व तारुण्यप्राप्त करून घेतले..….। तेव्हा आवळ्याचे हे गुणधर्म बघता सर्वानीच बाराही महिने कोणत्याही स्वरुपात आवळा खाल्लाच पाहीजे…!!!धन्यवाद!!!   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44.   Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

Uncategorized

हिवाळ्यातील आजार आणि घरगुती उपचार

हिवाळ्यातील आजार आणि घरगुती उपचार हिवाळ्यात वातावरण कसं असतं, मस्त गाऽऽर…अगदी थंडवाटतं थंडीत कधी, करूच नये निद्रादेवीशी बंड ॥सूर्यदेवही जांभया देत, जरा उशिराच उठतो गारठूनगुलाबी थंडीत आपल्या, सोनेरी किरणांची नक्षी पसरून ॥ हिवाळ्यात विशेषत्त्वाने काजू, बदाम, अंजीर, आक्रोड, खारीक, खोबरे, बेदाणे इत्यादी पदार्थांचं सेवन आपल्या प्रकृतीनुसार वाढवावं. हिवाळ्यात डिंक, सुकामेवा, बेसन, मेथी इत्यादींचे साजूक तुपात तळलेले लाडू शरिराला बलवर्धक ठरतात. रखरखीत उन्हाची काहिली देणारा उन्हाळा, चिंब भिजवणारा पावसाळा आणि थंडीने हुडहुडी भरायला लावणारा हिवाळा अशा तीन ऋतूंपैकी गुलाबी थंडीचा हिवाळा प्रत्येकालाच हवाहवासा असतो. हिवाळा सुरू झाला आणि थंडीची चाहूल लागली की अडगळीत पडलेले स्वेटर, मफलर तसेच लहान मुलांच्या कानटोप्या, पायमोजे बाहेर येऊ लागतात. मुळात वातावरणात गारवा असल्याने हिवाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत पचनशक्ती चांगली असते. त्यामुळे या काळात भूक चांगली लागले. म्हणूनच हिवाळ्यात सर्वप्रकारचा समतोल आहार घ्यावा. विशेषत: या काळात शरिरातील रुक्षता वाढत असल्याने स्निग्ध पदार्थांचे सेवन वाढवावे. हिवाळ्यात विशेषत्त्वाने काजू, बदाम, अंजीर, आक्रोड, खारीक, खोबरे, बेदाणे इत्यादी पदार्थांचं सेवन आपल्या प्रकृतीनुसार वाढवावं. हिवाळ्यात डिंक, सुकामेवा, बेसन, मेथी इत्यादींचे साजूक तुपात तळलेले लाडू शरिराला बलवर्धक ठरतात. हिवाळ्यात रात्र मोठी आणि दिवस तुलनेने लहान असतो त्यामुळे या काळात वारंवार भूक लागते. त्यामुळे सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्रीचं जेवण गरमागरम आणि पौष्टिक घ्यावं. या काळात सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळे, फळांचा रस सेवन करावा. मात्र ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा मधुमेहासारखा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारतज्ज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात बदल करावेत. थंडीची मौज प्रत्येकालाच स्वर्गीय सुखकारक वाटत असली तरी थंडीत आरोग्याचेही अनेक प्रश्न निर्माण होत असतात. थंडीत मुख्यत्वेकरून सांध्यांचे जुनाट आजार, त्वचेच्या समस्या त्याचप्रमाणे फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या समस्या तोंड वर काढतात. नेहमी दुखत असलेल्या शरिराच्या एखाद्या अवयवाचं दुखणं थंडीत असह्य होतं. थंडीत उद्भवणाऱ्या अशाच काही समस्यांचा आणि त्यांवरच्या उपायांचा परामर्श आपण आज घेणार आहोत. सांधेदुखी थंडीच्या दिवसांत मुख्यत: सांधेदुखीची समस्या डोकं वर काढते. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीत सांध्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. सांध्यांना थंड हवा लागू देऊ नये त्याचप्रमाणे पायांना, हातांना मोजे वापरावेत. थंड पाण्यात काम करणं टाळावं. शिळं आणि थंड अन्न घेऊ नये. बटाटे, उसळी, ब्रेड तसेच बेकरीचे पदार्थ, डाळी आणि डाळींच्या पीठाचे पदार्थ टाळावेत. मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा. गरम, ताजे अन्न घ्यावे. थंड पाण्यापेक्षा कोमठ पाणी प्यावं. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीच्या दिवसांत अतिश्रम करणं टाळावं. रात्री झोपताना सांध्यांना एरंडेल तेलाने मालिश करावं. विविध प्रकारचे गुग्गुळ, दशमुळांचा काढा तसेच इतर वनौषधींचा उपयोग वैद्यकीय सल्याने केल्यास सांधेदुखीचा त्रास आपण टाळू शकतो. दमा दम्याचा त्रास असणाऱ्यांना हिवाळा अत्यंत तापदायक ठरू शकतो. थंडीत छातीत कफ साचण्याची शक्यता जास्त असल्याने दम्याचा त्रास वाढू शकतो. म्हणून दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी थंड पाणी, आईसक्रीम, कोल्ड टी तसेच कोल्ड कॉफी तसेच विविध शितपेयं कटाक्षाने टाळावीत. दही, ताक, दूध, मिठाई दम्याच्या त्रासाला आमंत्रण ठरू शकतात त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन टाळावं. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी पाणी सहसा कोमट करून प्यावं. सुंठ आणि मध किंवा आल्याचा रस आणि मध हे मिश्रण दम्याच्या रुग्णांसाठी हिवाळ्यात आरोग्यदायी ठरतं. रात्री झोपताना तसेच सकाळी अंघोळीपूर्वी छातीला तीळतेल, महानारायण तेल लावून दररोज शेक घ्यावा त्यामुळे छातीत साचलेला कफ मोकळा होण्यास मदत होते. आयुर्वेदातील वमन हा उपक्रम दम्याचा त्रास कमी करण्यास मदत करतो. तसेच दम्याचा त्रास असणाऱ्यांनी 2 ते 3 कप पाणी घेऊन त्यात तुळस, अडुळशाची प्रत्येकी दोन पाने टाकावी आणि एक कप काढा राहील अशा रितीने उकळून कोमट काढा रात्री झोपताना किंवा सकाळी घ्यावा. त्याचप्रमाणे कोबी पाण्यात टाकून गरम करून त्याची वाफ घ्यावी. दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्राणायाम, कपालभारतीसारखे श्वसनसंस्थेशी संबंधित व्यायाम करावेत. च्यवनप्राश, सितोपलादी चूर्ण इत्यादी आयुर्वेदिक उपायही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत. तळपायाच्या भेगा हिवाळ्यात अनेकांच्या हातापायांच्या तळव्यांना भेगा पडतात. काही वेळेस या भेगा एवढं उग्ररुप धारण करतात की भेगांतून रक्तही येतं आणि वेदना असह्य होतात. थंडीमध्ये शरिरात रुक्षता म्हणजेच कोरडेपणा येतो आणि हातापायाच्या तळव्यांवरील त्वचा फाटते. त्वचा फाटल्याने भेगा तयार होता आणि त्या दुखतात किंवा अशा भेगांची आग होते. रुक्षान्नाच्या अतिसेवनामुळेही भेगा पडण्याचा आजार बळावू शकतो. म्हणून हातापायांच्या तळव्यांना भेगा पडण्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारात साजूक तुपाचा समावेश करावा. आहारात दूध, तुपासारखे स्निग्ध पदार्थ वाढवावेत. लोणचे, मिरचीचा ठेचा तसेच अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावेत. जागरणामुळेही शरिरात रुक्षता वाढत असल्याने रात्री जागरण करणं टाळावं. रात्री झोपताना भेगांना साजूक तूप लावावे. चंदन, लाख, ज्येष्ठमध त्याचप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध औषधी तेल भेगांवर लावावीत. ज्येष्ठमध साजूक तुपात टाकून पिल्यामुळंही भेगांचा त्रास कमी होण्यास मदत होते. त्वचेची काळजी हिवाळ्यात साधारणपणे रात्री थंड आणि दिवसा कडक उन असं वातावरण असल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. थंडीमुळे त्वचेतल्या तैलग्रंथी निष्क्रीय होऊन त्वचा निस्तेज आणि रखरखीत बनते. चेहऱ्यावर सुरकुत्या, त्वचा फाटणे, ओठ फुटणे अशा तक्रारी वाढतात. म्हणून हिवाळ्यात त्वचेची खास काळजी घ्यावी लागते. घराबाहेर पडताना चांगले विंटरकेअर लोशन वापरावे. असे विंटरकेअर लोशन आयुर्वेदिक असेल तर उत्तमच. अंघोळीनंतर घरगुती उपाय म्हणून खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर क्रीमऐवजी करावा. हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी आहारात थोडे बदल करावेत. मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सतेज दिसतो. त्याचप्रमाणे संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी होतो. रात्री झोपताना साय किंवा तूप घेऊन त्यात चंदन टाकून मालिश केल्यानेही त्वचेला तेज प्राप्त होऊ शकते. * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

blog

अपुरी झोप व आयुर्वेद

अपुरी झोप व आयुर्वेद नियमित व पुरेशी झोप न घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. नैराश्य व निद्रानाश यांच्यामध्ये परस्परसंबंध असल्याने पुरेशी झोप घ्यावी.झोप सातत्याने कमी होत असणारे 30% लोकांना दीर्घ कालीन गंभीर आजार होतात.उदा. हृदयरोग,हृदयाचे ठोके कमी-जास्त होणे,मधुमेह,उच्चरक्तदाबई.पुरेशी झोप न मिळाल्यास काम करताना निर्णय क्षमता कमी होते. नेहमी रात्री जागरण होत असेल तरचेहरा निस्तेज होतो, त्वचा सुरकुतलेलीदिसते, डोळ्यांखालील काळे वर्तुळ, काळी त्वचा व चेह-यावर – कायमस्वरूपी सुरकुत्या असे बदल होऊन व्यक्ती प्रौढ किंवा वृद्ध/वयस्कर दिसू लागते. योग्य वेळी झोपेचा अभाव असलेल्या पुरुष व स्रीयांमध्ये कामवासना कमी होणे, लैंगिक संबंधातील रस कमी होणे या गोष्टी आढळतात. त्यांच्या शरीरातील टॅस्टोस्टेरॉन (TESTESTERON) ची पातळी कमी होते.झोप कमी झाल्यामुळे स्मरणशक्ति कमी होते, ज्यामुळे वारंवार विस्मरण होते. उपाय : पुरेशी झोप होण्यासाठी आपली दिनचर्या चांगली असावी. सकाळी लवकर उठून योग्य प्रमाणात व्यायाम करावा.पौष्टीक व संतुलित आहार घ्यावा.संध्याकाळी जेवण सूर्यास्ताच्या वेळी करावे.रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करावा. झोपताना मधुर व मनाला आवडेल असे संगीत ऐकावे, रात्री झोपताना केसांच्या (SCALP) मुळाशी ब्राम्ही तेलाने मसाज करावे. रात्री झोपताना तळपाय स्वच्छ धुवून कोरडे करावे व त्याला शतधौत घृत या औषधीचा मलम लावून तळपायांना मसाज करावे. रात्री झोपताना म्हशीचे दूध १ कप + १ चमचा खसखस एकत्र करून पिणे. यामुळे झोप नियमित होते. रात्री झोपताना घरातील जायफळ उगाळावे. उगाळलेले १चमचा जायफळ चाटून घ्यावे. याने देखील झोप पूर्ण होते. अशाप्रकारे पूरेशी झोप घ्यावी व आपले आरोग्य जपावे. धन्यवाद !   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

Uncategorized

ओवा खाण्याचे फायदे

ओवा खाण्याचे फायदे “ओवा“स्वयंपाकात उपयोग होणा-या मसाल्याला औषधी महत्व खुप असते.याचे योग्य उदाहरण म्हणचे ओवा.ओव्याचा वापर हजारो वर्षांपासुन आजारांवर घरगुती उपाय म्हणुन केला जातो.आयुर्वेदानुसार ओवा पचनक्रीया सुधारते. हे कफ, पोट, छाती चे दुखणे आणि कीटकांचे रोगांसाठी फायदेशीर आहे.यासोबतच उचकी,ढेकर या आजारांसाठी फायदेशीर असते.ओव्यामध्ये 7 टक्के कोर्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लोविन, थायमिन, निकोटिनिक अॅसिड कमी प्रमाणात, थोड्या प्रमाणात आयोडिन, साखर, सेपोनिन, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये मिळणारे सुगंधीत तेल 3-4 टक्के असते, 5 ते 6 टक्के मुख्य घट थाइमोल असते. 1. पोट बिघडल्यावर ओवा चावुन खावा. यानंतर एक कप गरम पाणी प्या. 2. 10 ग्रॅम सुंठ, 5 ग्रॅम काळे मीठ, 2 ग्रॅम जीरे चांगल्या प्रकारे मिश्रण करा. या मिश्रणातील 3 ग्रॅम प्रमाण कोमट पाण्यत टाकुन दिवसातुन 4-5 वेळा घ्या. पोट दुखी होणार नाही. 3. पोटात जंतु असतील तर काळ्या मीठासोबत अर्धा चमचा ओवा खा. हे काही वेळा नियमित खाल्ल्याने पोटातील जंत नष्ट होतील. 4. 3 ग्रॅम ओवा आणि अर्धा ग्रॅम मीठ खाल्ल्याने हृदयाचे रोग दुर होतील. 5. गॅस झाल्यावर थोडी हळद, ओवा आणि एक चिमुट काळे मीठ मिळवुन खा. यामुळे लवकर आराम मिळेल. 6. 5 ग्रॅम ओवा पाण्यात टाकुन सेवन करा. महिन्यातुन पाच वेळा असे केल्याने मुतखडा कधीच होणार नाही आणि असेल तर निघुन जाईल. 7. तोंडले,ओवा,अद्रक आणि कापुर यांना समान प्रमाणात घेऊन कुटून घ्या.एका सूती कपड्यात गुंडाळुन थोडे गरम करा,सुजलेल्या भागावर हळु-हळू शेकल्यामुळे सुज कमी होईल. 8. दारुची सवय मोडण्यासाठी दिवसातुन प्रत्येक दोन तासाला ओवा चावण्यास द्या. लवकर परिणाम दिसेल. 9. ओवा भाजुन बारीक करा. या मिश्रणाने रोज दोन- तीन वेळा दात घासा. तुमचे दात मजबुत आणि चमकदार होतील. दात दुखत असल्यास ओवा पाण्यात उकळुन कोमट पाण्याने गुळण्या करा. दात दुखणे थांबेल. 10. आजवान बारीक करुन खोब-याच्या तेलात टाका आणि हे तेल कपाळावर लावा , डोके दु:खी थांबेल. 11. ओवा भाजुन एका कपड्यात गुंढाळा आणि रात्री झोपतांना उशा जवळ ठेवा, दमा, सर्दी, खोकला असणा-या लोकांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही. 12. दम्याच्या रोग्यांना रोज ओवा आणि लवंगच्या समान प्रमाण असलेले चुर्ण रोज दिले तर फायदा होतो. ओवा एखाद्या मातीच्या भांड्यावर जाळुन त्याचा धुर केला तर दम्याच्या रोग्यांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही. 13. ओव्याच्या रसामध्ये दोन चिमुट काळे मीठ मीळवुन सेवन करा आणि नंतर गरम पाणी प्या. खोकला बरा होईल. 14. कोरड्या खोकल्यापासुन त्रस्त असाल तर ओव्याचा रस मधात मिळवुन दिवसातुन 2 वेळा एक-एक चमचा सेवन करा. 15. गळ्यात खाज असेल तर बोराचे पाने आणि ओवा हे सोबत एकाच पाण्यात उकळा आणि गाळुन हे पाणी प्या. 16. अद्रकच्या रसामध्ये थोडे चूर्ण आणि ओवा मिळवून खाल्ल्याने खोकल्यापासुन आराम मिळेल. 17. ओवा विड्याच्या पानामध्ये ठेवून चावा. असे केल्याने कोरड्या खोकल्यापासुन आराम मिळेल. याव्यतिरिक्त ओवा खाल्ल्याने गळ्याची सूज आणि दुखणे थांबेल. 18. नाक बंद झाल्यावर ओव्याला बारीक करुन कपड्यात गुंडाळुन वास घ्या, आराम मिळेल. 19. जेवणा नंतर ओवा आणि गुळ सोबत खाल्ल्याने सर्दी आणि ॲसिडिटीपासुन आराम मिळेल. 20. 2 ते 3 ग्रॅम ओवा दिवसातुन तीन वेळा घ्या. सर्दी आणि डोकेदुखीपासुन आराम मिळेल. 21. पानच्या पाणांसोबत ओवा चावा, गॅस, पोटातील मुरडा आणि ॲसिडीटीपासुन आराम मिळेल. 22. 1 ग्रॅम भाजलेल्या ओवा पानामध्ये टाकुन चावल्याने अपचन पासुन आराम मिळेल. हिवाळ्यात शरीराला थोडी गर्मी देण्यासाठी थोडा ओवा चावा आणि पाण्यासोबत सेवन करा. 23. 1 चमचा ओवा आणि एक चमचा जीर एकसोबत भाजुन घ्या.मग हे पाण्यात उकळुन गाळुन घ्या. या पाण्यात साखर मिळवून प्यायल्याने ॲसिडीटीपासुन आराम मिळेल. 24. कॉलरा झाल्यावर कापुर सोबत ओवा मिळवून खाल्ल्याने आराम मिळेल.झोप न येण्याची समस्या असेल तर 2 ग्रॅम ओवा पाण्यासोबत सेवन करा. झोप चांगली येईल. 25. खाज येत असेल किंवा कुठे जळाले असेल तर, ओवा बारीक करुन तेथे लावा आणि 4-5 तास लावुन ठेवा. यामुळे फायदा होईल.धन्यवाद!!! * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

blog

आमसूलचे ( कोकम ) आरोग्यदायी फायदे

आमसूलचे ( कोकम ) आरोग्यदायी फायदे आपल्या जेवणात चवीसाठी आंबटपणा येण्यासाठीचे काम आमसूल करते.हे चिंचे ईतकेच महत्व असलेले औषध आहे.. म्हणून प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाक घरात असायलाच पाहिजे.आमसूलात लोह,कँलशिअम,फाँस्फरस,प्रथिने, फायबर व क,, जीवनसत्व असतं. आयुर्वेदाप्रमाणे कोकम, हे पित्तशामक,दिपक,पाचक, व ग्राहि गुणधर्माचे आहे.कोकमची साल, स्तंभन,म्हणजेच थांबवण्याचे काम करते, जसे आंव,जुलाब,उलटी 🌟⭐️*.. आमसूलाच्या बीचे तेल काढतात,त्यालाच आमसूलाचे तूप म्हणतात. कोकम पाण्यांत टाकून काढा, पिल्यास,अपचन दूर होते पचनसंस्था उत्तम काम करते.आमसूलात पाणी टाकून कोळ करावा, त्यांत वेलचि, खडिसाखर,टाकून सरबत करावे,हे प्यायल्याने, आम्लपित्त,दाह, तृष्णा,उष्णतेचे विकार दूर होतात.🌟⭐️.. कोकम गर, नारळ दूध,कोथिंबिर, व ताक टाकून सोलकढी पिल्यास, अन्नाचे निट पचन होते.अतिसार, संग्रहणि, रक्ताचे जुलाब, मुरडा हे सर्व कोकम गराचे सरबत घेतल्याने बरे होतात.पोटात कळ येऊन आंव पडत असेल तर, कोकमचे तेल भातात कालवून खावे, 🌟⭐️.. अंगावर पित्त उठले असल्यास, कोकम भिजवलेले पाणी सर्व अंगास लावावे हातापायाची उष्णतेमुळे आग होत असल्यास कोकम उकळलेले तेल लावावे. दाह कमी होतो.हिवाळ्यातील थंडीमुळे ओठ फुटत असतील तर कोकम तेल गरम करून लावावे.ओठ मऊ पडतात. 🌟⭐️.. हिवाळ्यांत शरीराची त्वचा कोरडी पडून भेगा पडतात.तिथे कोकम तेल लावावे.रोजच्या कोकम वापरामुळे आतडी मजबुत होतात.मूळव्याध असल्यास दह्यावरच्या निवळीत कोकम कल्क मिसळून प्यावे,रक्त येणे बंद होते. 🌟⭐️. उन्हाळ्यांत बाहेर पडण्याच्या आधी, कोकम सरबत प्यावे.ऊन बाधत नाही..वजन कमी करण्यासाठी ४०० ग्रँम कोकममध्ये ४ लिटर पाणी घालून उकळावे व एक लिटर करावे. मग सकाळ, संध्याकाळ १०० ml. प्यावे.. वजन कमी होते.. 🌟⭐️.. यांत व्हिटँमिन सी. विपुल आहे.. पोटँशिअम, मँग्नेशिअम खूप असल्याने ह्रदयविकार होत नाहीब्लडप्रेशर नाँर्मल राहतं.सर्व प्रकारचे फुफ्फुसाचे आजार, क्षयरोग,कंठरोग याच्या नियमित सेवनाने बरे होतात. 🌟⭐️.. रोजच्या आहारात कोकमचा वापर जर कायम ठेवला तर,अग्निमांद्य, अपचन,अरूचि,पोट तडिस लागणे हे विकार होत नाहीत…🌟⭐️🌟⭐️🌟…. *आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

Scroll to Top