सांधेदुखीवर घरगुती उपाय
सांधेदुखी ज्येष्ठ नागरिकांकडून सर्वसाधारणपणे नेहमीच एक तक्रार केली जाते,ती म्हणजे गुडघा दुखीची आणि गुडघा वाकवता न येण्याची.सध्या तरुणांमध्येही सांधेदुखीचं प्रमाण वाढत असून,ती सर्वांसाठी त्रासदायक ठरत आहे. सांधेदुखीमुळे होणाऱ्या वेदनांमुळे व्यक्तीच्या हालचालींवर मर्यादा येतात.या मर्यादांमुळे त्याच्या दैनंदिन कामावर थेट परिणाम होतो. त्यामुळे या विकाराची लक्षणं,त्याचं निदान, त्याच्या उपचारांची प्रक्रिया व हा त्रास होऊच नये म्हणून घ्यायची काळजी आणि या वेदनेतून मुक्त होऊन आरोग्यमय आयुष्य कसं जगावं,हे आपण बघुयात . कारणं आणि लक्षणं सांधेदुखीचं मुख्य लक्षण म्हणजे गुडघ्याभोवती असलेल्या कुर्चा ( कार्टिलेज ) झिजतात.त्यामुळे गुडघ्याची गादी कमी होते.यामागे विविध कारणं असतात,जसं की अनुवंशिकता,गुडघ्यावर सतत अतिरिक्त ताण येणं,स्थूलपणा,अयोग्य अशी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव. प्रत्येकाला गुडघेदुखीचा त्रास असतोच; पण सांधेदुखीचं गुडघेदुखी हे एकमेव लक्षण असू शकत नाही. गुडघेदुखी बरोबरच गुडघा वाकवता न येणं, त्यावर सूज येणं, सरळ चालताना तो दुखणं, चालताना कुर्चा दुखणे आणि सातत्यानं होणारी गुडघेदुखी हि सारी लक्षणं झीजेची असू शकतात. त्यामुळे अशा वेळी त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. आरोग्यदायी जीवनशैली जगा: बैठं काम असलेल्या जीवनशैलीमुळेही तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास निमाण होऊ शकतो.त्याचप्रमाणे व्यायामाचा अभाव, जास्त वजन, जंक फूड खाण्यामुळं तुमचा गुडघा कमकुवत होऊन त्याची हानी होऊ शकते. त्यातून कुर्चेचा स्तर कमी होत जातो. गुडघ्यातल्या कुर्चाची झीज झाल्यानंतर ती पुन्हा भरून येऊ शकत नाही.थोडक्यात आपली जीवनशैली कशी आहे,त्यावर गुडघ्यातील कुर्चाचं काम ठरत असतं. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनशैलीत बदल करून गुडघेदुखी दूर ठेवता येऊ शकते. उपचारांचे पर्याय: शरीरातील सांधेदुखीचे प्रमाण वाढल्यावर शरीरातील हालचालींवर मर्यादा येतात. वेदनाशामक औषधांमुळे केवळ तात्कालिक कालावधीसाठी वेदनेपासून मुक्तता मिळते;पण गुडघादुखीवर ही औषधं कायमस्वरुपी उपाय म्हणून गृहीत धरू नये. १. तीळ तेल कोमट करून त्याने गुडघ्यांची मसाज करू शकता किंवा महानारायण तेल कोमट करून मसाज करावे. गरम शेक घ्यावा यामुळे गुडघ्याला गतिशीलता आणि लवचिकता येते. २. गुडघ्यांची झीज होत असेल तर “जानूबस्ती” म्हणजे गुडघ्यांच्या भोवती पिठाचे पाळे करून औषधी तेल मुरवणे हे श्रेष्ठ उपचार आहेत. ३. लाक्षादी गुग्गुळ हि गोळी सकाळी १ आणि रात्री १ घ्यावी . ४. आहारातून कॅल्शियम ची कमतरता पूर्ण करावी. जर याने आराम नाही मिळाला तर जवळच्या आयुर्वेदीक तज्ञाची भेट घ्यावी . * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 शाखा-मुंबई-१) कोपरखैरणे २) दादरपुणे -१) निगडी २) बाणेर ३) मोशी. Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी
