मूळव्याध वर घरगुती उपाय
मूळव्याध वर घरगुती उपाय मूळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वाराजवळ असलेला / असलेले कोंब. हे कोंब गुदद्वाराच्या आत किंवा त्याच्या बाजूनेही असू शकतात. हे कोंब म्हणजे मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या असतात. होऊ नये म्हणून काय करायला हवेभरपूर पाणी, दररोज व्यायाम, शौचास जोर न करणे, एका जागी जास्त वेळ न बसणे, नेहमी वजनदार गोष्टी न उचलणे या गोष्टी पाळल्या तर मूळव्याध होणे टाळता येते. आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढवा, जेवणाच्या वेळा नियमित ठेवा, अतिरिक्त वजन कमी करा, मसालेदार पदार्थ, मांसाहार व अतियोग टाळा, मद्यपान किंवा धूम्रपान करू नका, रात्रीचे जागरण टाळा म्हणजे मूळव्याधीपासून दूर राहता येईल. आहारात तंतूंचा भरपूर समावेश व मल नरम राहील अशी योजना आवश्यक असते. आहार :-हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. लोणी खावे. ताजे ताक प्यावे.(आंबट नव्हे.) रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते. सुरणाची भाजी आठवड्यात एकदा तरी खावी,जेवणात हिरव्या भाज्या, पाले भाज्या, ब्राउन राईस, दूध, सुजी इत्यादीचे सेवन करा. जेवणात तांदूळ, गहु,यव,ज्वारी,दूधी,पडवळ,आंबटचुका,घोसाळी,मुग,तुर,सुंठ, मनूका, आवळा याचा वापर करा. हे खाऊ नका मका,उडीद,वाल,पावटे,शेंगदाणे,तळलेले पदार्थ,लोणची ,पापड, मास विशेषतः बीफ रेड मीट सेवन टाळा.घरगुती उपाययोजना◆रक्तस्राव असल्यास निरंजनचे फळ आणून ते पाउण पेला पाण्यात रात्री भिजू घालावे.सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करुन ते पाणी प्यावे.◆इसबगोल सकाळी भीजत ठेवून रात्री ते पाणी प्यावे.◆कोरफड व लिंबू रस एकत्रित लावल्यास तात्काळ रक्त थांबेल.उपडे झोपून हे मिश्रण आत सरकवावे.◆कासिसादी तेलाचा बोळा भिजून या जागेत ठेवा.◆दोन चमचे दुर्वा रस कपभर गायीच्या दुधात उकळून हे मिश्रण गाळून घेतल्यास फायदा होतो.◆डाळींबाच्या सालीचे चुर्ण एक तास भीजत घालून नंतर ताक व जीरपूड+ सैधव घालून रोज प्या.◆मुळ्याच्या रसात लिंबू व सैधव घालून प्या.◆चमचाभर जीरेपूड, धनेपावडर, ओवा अर्क,बडीशेप अर्क चमचाभर व पिव्वर गुलकंद ग्लासभर पाण्यात घालून प्या.◆चमचाभर लोण्यात नागकेशर चुर्ण टाकून दोन-तीन वेळा घ्या.◆कोरफड गर व चमचाभर मध,चमचाभर दुर्वाचा रस व तूप,एरंडेल यांचे क्रीम तयार करुन त्या जागेवर लावा.वरती कापूस लावा.थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा,म्हणजे छान मलम तयार होईल.◆मोड दुखत असेल तर,सुजला असेल,बाहेर आला असेल तर,विस्तवावर खारकेचे चुर्ण टाकून ती वाफ घ्या.मुळव्याध नियंत्रणासाठी अस्तित्वात असलेल्या उपचार पध्दती.◆मूळव्याधीच्या मुळाशी छेद घेऊन काढून टाकले जाते. यालाच हिमोरायडेक्टॉनी म्हणतात.◆मूळव्याधीचे कोंब स्टेपलर गनमध्ये घेऊन गन शूट केली जाते. या सर्जरीमध्ये मूळव्याध कट होण्याचे व स्टेपल होण्याचे कार्य एकाच वेळी होते.◆मूळव्याधीच्या ठिकाणी स्क्लेरोसंट इंजेक्शन टोचले जाते. वेदनाविरहित उपचार पद्धती आहे. रुग्णास ॲडमिट राहावे लागत नाही व मूळव्याधीमधील रक्तस्राव ट्रीटमेंटनंतर एक-दोन दिवसांत बंद होतो.◆डॉपलर गाइडेड हिमोराईड (मूळव्याध) आर्टरी (रक्तवाहिनी) लायगेशन (बांधणे) या उपचार पद्धतीमध्ये मूळव्याधीचा रक्तपुरवठा बंद केला जातो.◆मूळव्याधीच्या कोंबावर लेझर किरणांचा मारा करून रक्तवाहिन्या गोठवल्या जातात. यामुळे मूळव्याधीमधील रक्तस्राव बंद होतो◆या उपचार पद्धतीमध्ये मूळव्याधीचा रक्तस्राव बंद करण्यासाठी मूळव्याधीच्या कोंबांना नायट्रस ऑक्साइड वायूचा वापर करून गोठविले जाते यालाच फ्रायोसर्जरी असे म्हणतात.◆पाइल्स गनद्वारा मूळव्याधीच्या मुळाशी रबरबॅंड लायगेशन करुन रबरबँड बसविला जातो. मूळव्याधीच्या कोंबाचा रक्तपुरवठा बंद होऊन मूळव्याध निर्जीव होऊन गळून पडते.◆मूळव्याधीच्या मुळाशी क्षारसूत्र बांधले जाते. या चिकित्सेमध्येही रक्तपुरवठा बंद होऊन मूळव्याध निर्जीव होऊन गळून पडते. भगंदर या व्याधीमध्ये क्षारसूत्र चिकित्सेचा विशेष फायदा होतो. या उपचार पद्धतीनंतर भगंदर पुन्हा उद्भवण्याचे प्रमाण नगण्य आहे. * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल






