infertilityayurved

Uncategorized

blog, Uncategorized

Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे)

Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) तिल कफ और पित्त को कम करने में मदद करता है।तिल शरीर को मजबूत बनाते हैं और बालों के लिए बहुत फायदेमंद होते हैं। * तिल त्वचा के स्वास्थ्य के लिए अच्छे होते हैं, शरीर में कहीं भी अल्सर के लिए फायदेमंद होते हैं, दांतों के लिए अच्छे होते हैं, भूक और दिमाग की शक्ति बढानेवाला है * आयुर्वेद में तिल का उपयोग विभिन्न तरीकों से किया जाता है। सभी प्रकार के तेलों में तिल के तेल का उपयोग देखा जाता है। यह सिद्ध हो चुका है कि तिल का तेल न केवल अभ्यंग के लिए उपयोगी है, बल्कि इसे अन्य उपचारों जैसे कि बस्ती, शिरोबस्ती आदि के लिए भी अनुशंसित किया जाता है। * कई लोगों का अनुभव है कि बवासीर से पीड़ित व्यक्ति यदि तिल को पानी में भिगोकर उससे बने पेस्ट में मक्खन मिलाकर भोजन से पहले 2-3 दिन तक सेवन करें तो रक्तस्राव बंद हो जाता है।  – तिल को बालों के स्वास्थ्य के लिए अच्छा माना जाता है। ऐसा कहा जाता है कि अगर बालों में काले तिल का तेल लगाया जाए तो वे समय से पहले सफेद नहीं होते, बल्कि काले, घने और मुलायम बने रहते हैं। * सम्पूर्ण स्वास्थ्य के लिए तिल हमेशा आपके रसोईघर में होने चाहिए। मसालों में प्याज और लहसुन का उपयोग करने की अपेक्षा तिल को विभिन्न बीजों के साथ उपयोग करना भी बेहतर है। -पिसे हुए तिल, भुना हुआ सूखा नारियल, करी पत्ता, सूखी लाल मिर्च आदि से बनी तिल की चटनी खाना उत्तम है| इस मौसम में नियमित रूप से तिल के लड्डू और तिल की चिक्की खाना भी अच्छा होता है  तिल के लड्डू शरीर को कैल्शियम और आयरन से भर देते हैं और सर्दियों में शरीर को समग्र शक्ति प्रदान करने तथा गर्म रखने में मदद करते हैं।  ऐसे गुणयुक्त तिल खाए और स्वास्थ्य का लाभ उठाए तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला https://chat.whatsapp.com/D2JkOyBrBFk94OL1veCsNZ ।।हर घर आयुर्वेद।। ।।हर दिन आयुर्वेद।। आरोग्य तज्ज्ञ वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु) वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44  श्रीसाई आयुर्वेदिक पंचकर्म रूग्णालय.F1-बिल्डिंग, फ्लॅट-B3. दुसरा मजला, शिव साडीच्या वर, सेक्टर-०९. हॉटेल शबरी जवळ, वाशी-४००७०३, नवी मुंबई. शाखा- मुंबई- वाशी । दादर. पुणे- निगडी ।बाणेर । मोशी.    हेल्पलाइन नं: 7796775000 9422558509 9822634478 https://youtu.be/oopuj-isLZkhh Related Articles How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

Uncategorized

How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ?

How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? दिवाळी हा गोडधोड पदार्थांचा सण असतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक जण कोणताही विचार न करता, तेलकट किंवा गोड पदार्थ बिनधास्त खाताना दिसतात. पण, दिवाळीनंतर मात्र हेच लोक वजन वाढल्यामुळे चिंताग्रस्त होतात. दिवाळीनंतर वाढलेले वजन कसे कमी करावे, याविषयी आपण बघूया. आहारतज्ज्ञ सांगतात, “दररोज अतिरेकी प्रमाणात गोड पदार्थ खाल्ले, तर वजन नक्की वाढू शकतं. तेलकट पदार्थदेखील जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढतं. दिवाळीनंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मुळात ते कशामुळे वाढलं हे समजून घेणं गरजेचं आहे.जर फक्त फराळ खाण्यामुळे आणि अतिरिक्त खाण्यामुळे वजन वाढलं असेल, तर पुन्हा योग्य प्रमाणात जितका आवश्यक आहे तितका आहार घेण्यास सुरुवात करावी.” “आहाराचं नियोजन करताना तुम्ही योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात खाऊ शकता”. तुम्हाला या नियेजनाचा नेहमीच फायदा होऊ शकतो. व्यायाम आणि आहार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फक्त डाएट करीन आणि वजन कमी होईल किंवा मी फक्त व्यायाम करेन आणि आहाराकडे लक्ष देणार नाही, असं म्हणूनसुद्धा चालत नाही. दोन्ही गोष्टी एकत्र कराव्या लागतात; पण लक्षात घ्या अतिव्यायाम, खूप जास्त आहार, अतिपथ्य या बाबीही हानिकारक आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किमान एक तास व्यायाम आणि उत्तम आहार नियोजन या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. “वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणं कधीही फायदेशीर ठरत नाही. ज्या वेळेला आपण कर्बोदकं, प्रथिनं व स्निग्धांश यांचा विचार करतो. त्यावेळी हे लक्षात ठेवायला पाहिजे की, एकाच वेळी जेवण केल्यामुळे कधी कधी आपल्याला अत्यंत कमी प्रमाणात पोषक घटक मिळू शकतात; त्यामुळे त्याचा फायदा होण्याऐवजी आरोग्याचं नुकसान जास्त होतं.” गोड खाणं अचानक बंद केल्यानंतर नक्की मदत होते. मुळात गोड खाणं म्हणण्यापेक्षा जर तुम्ही पांढरी साखर पूर्णपणे वर्ज्य केलीत, तर तुमच्या शरीरामध्ये फक्त चांगलेच परिणाम दिसून येतील. असं केल्यानं तुमच्या शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारते. त्यामुळे वजनदेखील नियंत्रणात राहतं. त्याशिवाय तुमची विचार करण्याची पद्धत सुधारते, दातांचं आरोग्य उत्तम होतं, केस आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं, तुम्हाला व्यायाम करण्याची ऊर्जा मिळते आणि तुम्हाला व्यायाम करावासा वाटतो. सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे आता गोड पदार्थांपेक्षा तुम्ही स्निग्ध पदार्थांकडे लक्ष देणं जास्त आवश्यक आहे. गोड खाणं बंद केल्यानंतर दुष्परिणाम अजिबात होत नाहीत. कारण- ज्या वेळेला तुम्ही साखर बंद करता, त्या वेळेला भारतीय आहाराप्रमाणे जर बघायला गेलं तर तुमच्या आहारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कर्बोदकं असतात आणि त्यामुळे त्यातून मिळणारी साखर ही तुमच्या शरीराला पूरक आणि पोषक असते. “जर तुम्हाला वारंवार गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर पहिल्यांदा तुमची रक्त तपासणी करून घ्या. तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारच्या न्युट्रियंट्सची कमतरता आहे का, हे जाणून घ्या. जर तुम्ही कमी कॅलरीज खात असाल, तर त्यामुळेही तुम्हाला सतत गोड खावेसं वाटू शकतं आणि मुख्यत्वे गोड खाल्ल्यानंतर तुमचे हॅपी हार्मोनसुद्धा उत्तेजित होतात. त्यामुळे गोड खाल्ल्यानंतर तुम्हाला तात्पुरतं खूप चांगलं वाटतं,” असे सांगतात.  “गोड खाण्याच्या बाबतीत तुम्ही मनावर ताबा ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि गोड खाण्याचं प्रमाण कमी असणं देखील तितकंच गरजेचं आहे.” https://chat.whatsapp.com/D2JkOyBrBFk94OL1veCsNZ ।।हर घर आयुर्वेद।। ।।हर दिन आयुर्वेद।। आरोग्य तज्ज्ञ वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु) वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44  श्रीसाई आयुर्वेदिक पंचकर्म रूग्णालय.F1-बिल्डिंग, फ्लॅट-B3. दुसरा मजला, शिव साडीच्या वर, सेक्टर-०९. हॉटेल शबरी जवळ, वाशी-४००७०३, नवी मुंबई. शाखा- मुंबई- वाशी । दादर. पुणे- निगडी ।बाणेर । मोशी.    हेल्पलाइन नं: 7796775000 9422558509 9822634478 https://youtu.be/oopuj-isLZkhh Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी महिला आणि आरोग्य

Uncategorized

पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी पावसाळ्यातील आजार नुकताच पावसाळा सुरु झाला आहे. साहजिकच सर्वांना पावसात भिजायला आवडते. परंतु या सुखद अनुभवासोबतच आपण वेगवेगळे आजार घेऊन येतो. तसेच हे वातावरण जीवजंतूसाठी पोषक असते. आयुर्वेद शास्त्रानुसार पावसाळ्यामध्ये पाणी आणि वारा दूषित झालेला असतो. त्यामुळे जंतूसंसर्ग होऊन साथीचे आजार लवकर पसरतात. पावसाळ्यात आढळणाऱ्या सामान्य व्याधी म्हणजे ताप, सर्दी, खोकला, जुलाब, अतिसार, उलट्या होणे. पावसाळ्यातील विषाणूजन्य व्याधी म्हणजे मलेरिया, हिवताप, स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकन गुनिया, कावीळ, कॉलरा. तसेच पावसाळ्यात सांधेदुखी, अस्थमा, आमवात, पचनाचे आजार, अम्लपिल यांसारख्या जुनाट व्याधीदेखील डोके वर काढू लागतात. योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास वरील आजारांची तीव्रता कमी अधिक प्रमाणात जाणवते. या दूषित वाऱ्यापासून आणि पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून काय करावे, काय खावे, कसे वागावे यासाठी आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या वर्णन केलेली आहे. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यातील आजारांपासून आपले व आपल्या कुटुंबियांचे कसे संरक्षण करावे. *हे आजार होऊ नयेत म्हणून आपण खालील काळजी घ्यावी. * 1. पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे. 2. पालेभाज्या, फळे वापरताना मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवाव्यात. 3. रस्त्यावरील उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत. 4. दूषित हवेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी दररोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये वेखंड, गुग्गुळाचा धूर करावा. 5. पावसाळ्यामध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. अतिसार, मलेरिया, गोवर, कांजिण्या या व्याधींचे प्रमाण लहान बालकांमध्ये वाढलेले दिसते. हे टाळण्यासाठी मुलांना आयुर्वेदिक सितोपलादी चूर्ण, अरविंदासव, महासुदर्शन काढा आदी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने नियमित द्यावीत. हे लक्षात ठेवा 1. दररोज सर्वांगाला तिळाचे तेल कोमट करून मसाज करणे, व नंतर कोमट पाण्याने स्नान करावे. 2. गाईच्या दुधात हळद, सुंठ व तुळशीची पाने उकळून सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. 3. पावसाळ्यात तळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न, बेकरीचे पदार्थ, साबुदाणा, मसालेदार, चमचमीत अन्न, फास्ट फूड आरोग्यास हानिकारक आहेत. 4. फ्रिजमधील अतिथंड पाणी पिणे, कोल्ड ड्रिंक्स, आइसक्रीम यामुळे भूक मंदावते. सर्दी, खोकला यासारखे आजार लवकर होतात. 5. गुणांनी विरुद्ध असणारे अन्नपदार्थ खाऊ नयेत. उदा. दूध +फळे, मिल्कशेक, दूध व मासे,मांसाहारानंतर आईस क्रीम.इ. * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु) वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर. पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? महिला आणि आरोग्य

Uncategorized

महिला आणि आरोग्य

महिला आणि आरोग्य महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आज खूप महत्त्वाचे आहे. कारण कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते,ती जागृत व्हावी आणि समाजात हे त्यांच्या विषयी आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी हे गरजेचे आहे. आहार,चांगल्या सवयी,योगा आणि वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीवर महिलांचे आरोग्य टिकणे आवश्यक आहे.समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धा,वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे महिला आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.महिलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. वैद्यकीय कारणानुसार वीस ते तीस वर्षं हे वय प्रसूतीसाठी योग्य असते. पूर्वी प्रत्येक स्त्रीला पाच ते सहा वेळा बाळंतपणाच्या दिव्यातून जावे लागत होते. घरगुती बाळंतपणात कधी मातेचा जीव जात असे.आता शस्त्रक्रिया मध्ये रक्तस्राव झाला तर रक्त पुरवण्याची सोय असल्याने माता मध्ये माता मृत्यु व बाल मृत्यू चे प्रमाण कमी झाले आहे. सध्याच्या बदलत्या जीवन शैलीमुळे स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग या आजारांना महिलांना तोंड द्यावे लागत आहे. आज महिला चुल आणि मूल या पलीकडे गेल्या आहेत.घराबाहेर पडून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.ह्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी कामासोबत आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात.शहरातील सुमारे तीस टक्के महिलांना स्तनाचा कॅन्सरचा धोका आहे. स्त्रीयांमध्ये संधिवात, डायबिटीस, उच्च रक्तदाबाच्या तक्रारी वाढत आहेत. स्त्रियांचे मानसिक आरोग्य,जननसंस्थेचे आजार व कॅन्सर आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदीबाबत महिलांनी आरोग्यविषयक उपक्रम जागरुकपणे राबविल्यास अनेक महिला आपला जीव,प्राण वाचवू शकतात.आपल्याकडे अनेक स्त्रियांना चाळीसच्या आत त्यांना त्रासदायक सांधेदुखीचा त्रास चालू होतो. स्त्री आरोग्य बाळंतपण एवढ्यावरच मर्यादित न राहता स्त्रियांच्या आरोग्याचा सर्वांगीण विचार करणे गरजेचे आहे. महिलांचा आहार सध्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया हिरिरीने भाग घेत आहेत. प्रगती करत आहेत. राजकारण,शिक्षण,सरकारी नोकरी या सर्व ठिकाणी स्त्रियांसाठी आरक्षण आहे. घराबाहेर सर्व क्षेत्रे काबीज करणाऱ्या स्त्रिया घरांमध्ये स्वतःकडे किती हिरिरीने पाहतात, स्वतःच्या आरोग्य,आवडीनिवडी यांना किती महत्त्व देतात? जरी अर्ध्या आयुष्य स्वयंपाक घरात जात असले तरी सर्वांचे जेवण झाल्यानंतर उरेल तेच खायच आणि काही वाया जाऊ द्यायचे नाही म्हणून संपवायच,या मानसिकतेतून आजची स्त्री एकविसाव्या शतकात देखील बाहेर येत नाहीये. जेव्हा आपण सकाळी उठतो, तेव्हा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी जागी होते. त्याला भूक लागलेली असते आणि तिला काम ही करायच असतं.त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या लवकरात लवकर दुध घेणे किंवा DryFruits खाल्ले पाहिजे आणि चहा हा त्यावरचे उत्तर नाहीच,यामुळे भूक याची भावना विसरून जाते. आपण नाष्टा पुढे ढकलतो.सकाळी लवकर नाष्टा केला तर दिवसभरात अचानक भूक कमी लागते व पित्त होणे या गोष्टीचा त्रास होत नाही. नाश्त्यामध्ये बाहेरून आणलेले ब्रेड,बिस्कीट वगैरे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या एखादा धान्याचा पदार्थ खाल्ल्यास उत्तम. दुपारच्या जेवणामध्ये भात,वरण,भाकरीसोबत हिरव्या पालेभाज्या,डाळी उसळी,ताक,दही अशा पदार्थांचा समावेश असू द्या.मुले नवरा घराबाहेर आहेत किंवा तिकडेच जेवतात म्हणून कितीतरी स्त्रिया स्वतःसाठी स्वयंपाक करण्याचा आणि खाण्याचा कंटाळा करतात. जेवणाची एखादी वेळ सोडल्यास आपले दैनंदिन पोषण मुल्यांची गरज पूर्ण होणार नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. संध्याकाळी चिप्स,चिवडा या गोष्टीपेक्षा सुकामेवा,फळे,लाह्या,गुळशेंगदाणे,फुटाणे अशा पदार्थांचे सेवन करावे.रात्रीचा आहार शक्यतो हलका असावा.त्यामधे तळलेले पदार्थ,गोड पदार्थ, खाणे टाळावे.अंडी,मासे करण्यासाठी संध्याकाळची वेळ योग्य ठरते.आपला आहार हे आपले इंधन आहे हे ध्यानात घेऊन प्रत्येक स्त्रीने आजाराविषयी काळजी घेतली पाहिजे. योग आणि महिला महिला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांच्या,पतीच्या आणि इतर कौटुंबिक सदस्यांच्या सेवेत स्वतःला गुंतवून घेतात.महिला कुटुंबाविषयी नितांत समर्पणाची जबाबदारी पार पाडतात. पण हे सर्व करताना पुरेश्या व्यायामाअभावी स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत जाते आणि मग वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या भेडसावतात.आरोग्याच्या तक्रारी वाढतात.अंगावर दुखणे काढल्याने समस्या अजून जटिल होत जातात आणि मग कुटुंबाच्या देखभालीत कमी पडल्याने मानसिक ताणतणाव वाढत जातो आणि स्वभाव चिडचिडा होणे,राग येणे सुरू होते.मग मानसिकदृष्टया महिलेमध्ये एकटेपणाची भावना वाढून जाते.त्यामध्ये डिप्रेशन येते, मग या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी जो वैद्यकीय खर्च करावा लागतो तो निराळाच.पण मग हे सर्व टाळू शकत नाही का? तर नक्कीच टाळू शकतात.यासाठी महिलांनी थोडा स्वार्थी होणे गरजेचं असतं त्यांनी स्वतःला पण वेळ द्यावा. पुरेसा व्यायाम करावा,चालणे, योग करणे इत्यादी व्यायाम प्रकार करावेत किंवा स्वतःच्या जीवन शैलीचा तो एक भाग बनवून घ्यावा. रोज अर्धा ते एक तास योगा केल्याने तर महिलांच्या अनेक समस्या सुटू शकतात. वाढते वजन नियंत्रणात येते.सांध्यांचा त्रास, गुडघेदुखी,श्वसनाचे विकार बरे होतात. वाढते शुगर, कोलेस्ट्रॉल,गर्भाशयाच्या तक्रारी इत्यादी वर योग वरदान म्हणून सिद्ध झाला आहे. अनेक आजार तर हार्मोन्स इनबॅलन्सने सुरू होतात. योगा तर ह्या सर्वांच्या मुळावर घाव घालत असल्याने या समस्या सराईतपणे बऱ्या होतात.आसन,प्राणायाम,सूर्यनमस्कार, व्यायाम केल्याने मात्र महिला चांगले घरकाम करू शकतात.म्हणूनच समस्या निर्माण होण्याआधी सावध होणे गरजेचे असते. म्हणून प्रत्येक स्त्रीने योगाला महत्व देऊन आपले आरोग्यपूर्ण जीवन जगावे. * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-411044 शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर.पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Uncategorized

गुडीपाडवा

गुडीपाडवा गुडीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे नवीन उद्योगाचा,व्यवसायाचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा आरंभ करण्यास हा मुहूर्त शुभ मानला जातो. गुढीपाडव्याला नवीन वर्ष म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. हाच वर्षांरंभाचासुद्धा दिवस असल्यामुळे खगोलीय गणितानुसारदेखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे. गुढीपाडवा साजरा करण्याचे कारण याचे उत्तर दडले आहे शालीवाहन राजवटी मध्ये! शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. या दिवशी पंचाग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस. याच दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे. गुढी कशी सजवतात? तसं तर प्रत्येक प्रांतानुसार गुढी सजवायची पद्धत वेगळी असते. पण सामान्यत: एक समान पद्धत सुद्धा दिसून येते. ज्यानुसार नवीन वर्षाचे स्वागत म्हणून एका उंच काठीला रेशमी साडी व भरजरी खण घेऊन त्याची घडी बांधली जाते. नंतर त्या काठीवर चांदीचा वा अन्य धातूचा तांब्या उपडा ठेवला जातो. आंब्याची पाने व कडूनिंबाची डहाळी देखील त्यावर बांधून गुढी अधिक सुंदर सजवली जाते. शेवटी फुलांचा हार आणि अत्यंत विशिष्ट अशी साखरेच्या गाठीची माळ चढवली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब घालून बनवलेल्या मिश्रणाचे महत्त्व गुढीपाडव्याच्या प्रसाद म्हणून कडूनिंबाची पाने-मोहर, धणे आणि गुळ यांचा विशेष योग तयार करण्याची पारंपारिक प्रथा आहे. यामध्ये गुळ हा चवीने गोड आणि गुणाने उष्ण असल्याने शरीरातील दुष्ट कफाचा नाश करून शरीरस्थ जठराग्नी सुस्थितीत राखायला मदत करतो. पातळ झालेल्या दुष्ट कफामुळे शरीरात अनेक प्रकारच्या कृमींची उत्पत्ती होते. या स्थितीत कृमीनाशक, कफदोषशामक, रक्तशोधन करणार्‍या गुणांचा कडुनिंब वापरण्याचा शास्त्रादेश असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. धणे हे पित्तशामक, दाहशामक, शरीराला थंडावा देणारे आहे .गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब आणि अन्य पदार्थ एकत्रित करून मिश्रण सिद्ध (तयार) केले जाते. या दिवशी मिश्रणासाठी कडुनिंबाचाच वापर करण्यामागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.जो यजमान आहे त्याला ते रोगशांती, व्याधींचा नाश व्हावा आणि सुख, विद्या, आयुष्य, लक्ष्मी (संपत्ती) लाभावी म्हणून भक्षण करण्यास सांगितले आहे.कडुनिंब घालून बनवलेले मिश्रण ग्रहण केल्यावर मुखाद्वारे चैतन्याचा प्रवाह देहात प्रक्षेपित होतो.. !!गुडीपाडव्याच्या आरोग्यदायी शुभेच्छा !!   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Uncategorized

डोळ्याखाली काळे सर्कल

डोळ्याखाली काळे सर्कल डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं तरूण वयात वयस्कर बनवतात. या काळ्या वर्तुळांमुळे समोरच्याला तुम्ही थकलेले किंवा आजारी भासतात.यांनाच डोळ्याभोवती काळी वर्तुळे, Periorbital circles ,Under eye circles ,Dark circles असे ही म्हणतात.मेकअपनं काळी वर्तुळ झाकता येत असली तरी हा त्याच्यावरचा परीपुर्ण उपाय नव्हे. डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळे जाण्यासाठी नियमित उपचार करावे लागतात. अर्थात उपचाराचा परिणाम दिसण्यासाठी खूपच संयम ठेवावा लागतो. आता आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने या समस्येचा विचार करु या. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे वात व पित्त दूषित होऊन स्थानसंश्रय भेदाने डोळ्याच्या त्वचेखाली वैवर्ण्य किंवा गडदपणा निर्माण होतो. आपल्या डोळ्यांच्या खाली व गालांच्या वर जी त्वचा असते, ती खूप नाजूक आणि कमालीची पातळ असते. त्या त्वचेला रक्तपुरवठा करणार्‍या खूप सूक्ष्म अशा केशवाहिन्यांचे एक जाळे त्यामध्ये असते. त्या केशवाहिन्यांमधून रक्त वाहताना त्यांच्या बाह्य आवरणातून काही लाल रक्तपेशी बाहेर पडतात आणि त्वचेखाली जमा होतात. केशवाहिनीच्या बाहेर पडलेल्या या पेशी मृत पावतात. त्या ठिकाणी काही किण्वक रस निर्माण होतात आणि रक्तपेशींचे विघटन होऊ लागते. विघटित होताना या लाल रक्तपेशीतून एक निळसर काळे रंगद्रव्य निर्माण होते. त्याच्या रंगामुळे ही नाजूक त्वचा काळी दिसू लागते.ही वर्तुळ येण्याची कारणे. *हर्मोन मधील बदलामुळे स्त्रीयांना मासिक पाळीच्या वेळी हे बदल होतात.*आपणास एखाद्या विशिष्ट गोष्टीची अँलर्जी वारंवार होत असेल तरीही ही वर्तुळ येतात.*लिव्हर संबंधित आजार कावीळ असल्यास ही हे बदल होतात.*अशक्तपणा, अँनिमिया, पंडूरोग अथवा शरीरात झपाट्याने कमी होणारी आयरनची मात्रा अथवा या आजारामुळे ही आयरनची मात्रा कमी होऊन परिणामी डोळ्याखाली डाग येतात.*व्हिटॅमिन चा अभाव शरीरात अ’, ‘क’, ‘ई’ आणि ‘के’ जीवनसत्वे योग्य प्रमाणात नसल्यास ही वर्तुळे येऊ शकतात.*घरात अनुवंशिकतेमुळे ही अशी वर्तुळ दिसतात.*वाढत्या वयोमानानुसार ही काळी वर्तुळ दिसतात.*कायमस्वरूपी सर्दी होत असेल तरीही या भागातील नसा हळव्या होऊन हा त्रास होऊ शकतो.*बर्याच कालावधी पासून शरीरात चर्मरोग तरीही वर्तुळ तयार होतात.*सतत रडल्याने ही समस्या निर्माण होते.*आहारात मिठाचे प्रमाण अधिक असल्यास ही समस्या जन्म घेते.*कमी पाणी प्यायल्याने देखील ही समस्या निर्माण होते या केसमध्ये घातक विषक्त पदार्थ बाहेर न पडल्याने समस्या निर्माण होते.*रक्तातील हिमोग्लोबीन कमी झालं असल्यास काळी वर्तुळं येतात.*अपुरी झोप,सततची चिंता,भिती, तणाव,अतीविचार यामुळे ही समस्या तयार होते.*अधिक काँप्युटर, मोबाईलचा वापर.*योग्य चौरस आहाराचा आभाव जंकफूड,सर्व भाज्या न खाणे आवडनिवड अधिक.*पोटसाफ नसणे,सतत बध्दकोष्ठ, गँसेस,सतत धावपळ या गोष्टी सुध्दा या समस्येला जन्म देतात.*कच्चे अथवा कमी शिजवलेले मटण खाल्यामुळे हे इनफेक्शन होते यालाParasite infection इनफेक्शन असेही म्हणतात.यामुळे डोळेसूजतात,डोळ्यांच्या त्वचेचा रंग बदलतो व डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येतात.*कधीकधी थायरॉईड हॉर्मोन्सच्या अभावामुळे डोळ्याच्या टिश्यूजमध्ये पाणी जमा झाल्याने काही लोकांच्या डोळ्याखालील त्वचेचा रंग गडद होतो.*किडनी मध्ये बिघाड झाल्यास त्वचेखाली द्रवपदार्थ साठू लागतात.त्यामुळे या विकाराचे प्रथम लक्षण सूजलेले व काळी वर्तुळे निर्माण झालेले डोळे हे असू शकते.*जवळचे किंवा लांबचे पाहताना त्रास होत असल्यास, समोरचे पाहताना डोळ्यांवर ताण येत असल्यास डोळ्यांभोवती काळी वर्तुळे निर्माण होतात.*अॅमलॉईड या प्रोटीनच्या जमा होण्याने ही समस्या निर्माण होते.कधीकधी काही रुग्णांमध्ये यामुळे त्वचेतून रक्त देखील येऊ लागते.या स्थितीत डोळ्यांच्या पापण्यांखालील छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमा झाल्याने त्वचेवर गडद रंगाचे चट्टे दिसतात अथवा काळे डार्कसर्कल तयार होतात यालाAmyloidosisअसे ही म्हणतात.*डोळ्याच्या पापण्या व आजूबाजूच्या भागाला हे इनफेक्शन व दाह झाल्यामुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळे येतात.या स्थितीला Periorbital cellulitis असेही म्हणतात. *** *आहार *** संतुलित आहाराला प्रथम प्राधान्य द्यावे. कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न असलेला आहार, त्याचबरोबर जास्त फायबरयुक्त आहार व आहारात पालेभाज्यांचा वापर करावा. दूध व तुपाचे रोज सेवन करावे. फलाहार घ्यावा. तेलकट,अर्धकच्चे भोजन,अती जड पदार्थ ,तिखट पदार्थ अतिप्रमाणात सेवन करू नये. शरीर रूक्ष होऊ नये म्हणून रोज आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. यावरील घरगुती उपाययोजना *चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवा. सकाळी धुऊन टाका. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.*बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्यांखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा.*पदिना वाटून त्यामध्ये लिंबाचा रस टाकून काळ्या वर्तुळांना लावावा व पंधरा ते वीस मिनिटांनी पाण्याने धुवून टाकावे.*बाटाटा व काकडीचा रस काढून त्या रसात कापसाचे बोळे बुडवून ते पंधरा मिनिटे बंद डोळ्यांवर ठेवावेत.गुलाबपाण्यात कापसाचे बोळे बुडवून दोन्ही डोळ्यांच्या पापण्यांवर झोपताना नियमित ठेवावेत.*एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (काही थेंब) एकत्र करून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्यांखाली लावावे. दोन मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर थंड पाण्याने डोळे धुवून काढावे.*जायफळ चांगले पाण्यात उगाळून काळ्या वर्तुळांना रात्री झोपताना लावावे*चहाचा चोथा थंडकरुन याने हलकेच डोळ्याखाली मसाज करा.याने छान स्क्ररबींग होऊन रक्तपुरवठा सुरळीतपणे होऊन ही समस्या दुर होईल.*काकडीची गोल काप करून दिवसातून दोन ते तीन वेळा १o मिनिटे डोळ्यांवर ठेवा.*कोरफडीचा गर काढुन किंचित हळद घालून नियमितपणे लावावा.*खोबरेल तेल, एरंड तेल मिक्स करुन लावावे.* कुंकुमादि तेल, दूध, हळद, केशर, ग्रीन टी एकत्रित पेस्ट करून लावावे हलका मसाज करावा. औषधी उपाययोजना औषधांमध्ये गंधक रसायन, आमलकी रसायन, आवळा मुरब्बा, च्यवनप्राश, सारीवाद्यासव, खदीरारिष्ट, मंजिष्ठा, आरोग्यवर्धिनी.तसेच अनेक औषधांचा वापर वैद्याच्या सल्याने करता येतो. * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Uncategorized

कास्याच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा?

कास्याच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा? आपल्याकडे आयुर्वेदावरील ग्रंथामध्ये “पादाभ्यंग” सांगितलेले आहे त्यात कास्याच्या वाटीने पायाला गायीचे तूप किंवा खोबरेल तेल चोळणे हा प्रमुख उपचार सांगितला आहे त्याचे फायदे खालीलप्रमाणे:- ◆ शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी◆ शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी◆डोळ्याच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी◆शरिरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढविण्यासाठी◆मधुमेहामुळे होणाऱ्या पायाच्या संवेदना कमी होण्यासाठी◆निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी◆पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी◆गुढघेदुखी, टाच दुःखी, कंबरदुखी अशा त्रासाचे प्रमाण कमी करण्यासाठी◆पायावरची सूज कमी करण्यासाठी◆तळव्याला भेगा पडणे तसेच पायाची जळजळ होणे या समस्या कमी करण्यासाठी◆व्हेरिकोज व्हेन्स वर उपयुक्त◆डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यासाठी◆चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी भावप्रकाश या ग्रँथात म्हटले आहे “कांस्यम बुद्धीवर्धकम”आपल्या मराठीत एक म्हण आहे ” तळपायाची आग मस्तकात जाणे” आणि ती अक्षरशः खरी आहे तळपायाला कास्याच्या थाळीने मसाज केल्याने डोके शांत का होते याचे उत्तर या म्हणीत सापडते.वात जे अनेक रोगांचे मूळ आहे त्याचे शमन करून मर्यादित ठेवण्यासाठी हा उपचार अतिशय परिणामकारक असल्याचे अनुभवास आले आहे, युरोप व अमेरिकेमध्ये तर भरपूर पैसे मोजून लोक ही ट्रीटमेंट घेत असतात. संस्कृतमध्ये 1 श्लोक आहे ज्यात म्हटलं आहेजो मनुष्य झोपण्यापूर्वी पायांना मसाज करतो त्याच्यापासून रोग असे दूर राहतात जसे गरूडपासून साप .आपल्या शरीरात 72000 नाड्या आहेत त्यातल्या बऱ्याच नाड्यांचा शेवट हात आणि पायाच्या तळाव्यात होतो त्यामुळे तळव्याचा मसाज हा अनेक दुखण्यावरचा एक गुणकारी व कमी खर्चाचा उपाय आहे.ऐतिहासिक वारसाकांस्य हा धातू आपल्याला फक्त सुवर्ण आणि रोप्य पदकांसोबत कांस्य पदक देतात म्हणून माहिती आहे. भारतात बहुतेक प्रांतामध्ये लग्नामध्ये मुलीला कास्याची वाटी देण्याची प्रथा दिसून येते पण तिचा उपयोग मात्र कमीच केला जातो. कासे हा तांबे आणि जस्त यांचा संमिश्र धातू असून आयुर्वेदाने त्याचा उपयोग शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी म्हणून 5000 वर्षांपूर्वीपासून सांगितलेला आहे. गुजरातमध्ये जेवणासाठी कास्याच्या थाळ्याच वापरतात, पूजेसाठी कास्याचे तबक वापरले जाते, मंजुळ आवाजासाठी मंदिरातल्या घंटासाठीही कासेच वापरले जाते, तसेच काठिण्य व ऑक्सिडेशन न होण्याच्या गुणधर्मामुळे तोफा बनविण्यासाठी हा धातू वापरला जात असे, पूर्वी रशियामध्ये चर्चघंटा, तर स्पेन आणि पुर्तुगालमध्ये तोफा या धातूच्या बनवीत असत.वातव्यधीहरम कफप्रशनम कांतीप्रसादावहम त्वगवेवर्ण्य विनाशनम रुचिकरमम सर्वांग दाढर्याप्रदम आग्नेरदीप्तीकर्मम बलोपजननं प्रस्वेद मेदोप महं पदभ्याम मर्दनमुदिशनती मूनया: श्रेष्ठम सदा प्राणायामम्हणजे ऋषि मुनी सांगतात की पायाला तेल किंवा तुपाने मसाज करणे कफनाशक आहे.सुवर्णासमान कांती प्रदान करणारे, त्वचेचा वर्ण गौर करणारे, अग्नी प्रदीप्त करणारे, बलकारक, मेद-स्वेद कमी करणारे,आणि रुचिकारक आहे .   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Uncategorized

हिवाळ्यातील आजार आणि घरगुती उपचार

हिवाळ्यातील आजार आणि घरगुती उपचार हिवाळ्यात वातावरण कसं असतं, मस्त गाऽऽर…अगदी थंडवाटतं थंडीत कधी, करूच नये निद्रादेवीशी बंड ॥सूर्यदेवही जांभया देत, जरा उशिराच उठतो गारठूनगुलाबी थंडीत आपल्या, सोनेरी किरणांची नक्षी पसरून ॥ हिवाळ्यात विशेषत्त्वाने काजू, बदाम, अंजीर, आक्रोड, खारीक, खोबरे, बेदाणे इत्यादी पदार्थांचं सेवन आपल्या प्रकृतीनुसार वाढवावं. हिवाळ्यात डिंक, सुकामेवा, बेसन, मेथी इत्यादींचे साजूक तुपात तळलेले लाडू शरिराला बलवर्धक ठरतात. रखरखीत उन्हाची काहिली देणारा उन्हाळा, चिंब भिजवणारा पावसाळा आणि थंडीने हुडहुडी भरायला लावणारा हिवाळा अशा तीन ऋतूंपैकी गुलाबी थंडीचा हिवाळा प्रत्येकालाच हवाहवासा असतो. हिवाळा सुरू झाला आणि थंडीची चाहूल लागली की अडगळीत पडलेले स्वेटर, मफलर तसेच लहान मुलांच्या कानटोप्या, पायमोजे बाहेर येऊ लागतात. मुळात वातावरणात गारवा असल्याने हिवाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत पचनशक्ती चांगली असते. त्यामुळे या काळात भूक चांगली लागले. म्हणूनच हिवाळ्यात सर्वप्रकारचा समतोल आहार घ्यावा. विशेषत: या काळात शरिरातील रुक्षता वाढत असल्याने स्निग्ध पदार्थांचे सेवन वाढवावे. हिवाळ्यात विशेषत्त्वाने काजू, बदाम, अंजीर, आक्रोड, खारीक, खोबरे, बेदाणे इत्यादी पदार्थांचं सेवन आपल्या प्रकृतीनुसार वाढवावं. हिवाळ्यात डिंक, सुकामेवा, बेसन, मेथी इत्यादींचे साजूक तुपात तळलेले लाडू शरिराला बलवर्धक ठरतात. हिवाळ्यात रात्र मोठी आणि दिवस तुलनेने लहान असतो त्यामुळे या काळात वारंवार भूक लागते. त्यामुळे सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्रीचं जेवण गरमागरम आणि पौष्टिक घ्यावं. या काळात सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळे, फळांचा रस सेवन करावा. मात्र ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा मधुमेहासारखा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारतज्ज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात बदल करावेत. थंडीची मौज प्रत्येकालाच स्वर्गीय सुखकारक वाटत असली तरी थंडीत आरोग्याचेही अनेक प्रश्न निर्माण होत असतात. थंडीत मुख्यत्वेकरून सांध्यांचे जुनाट आजार, त्वचेच्या समस्या त्याचप्रमाणे फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या समस्या तोंड वर काढतात. नेहमी दुखत असलेल्या शरिराच्या एखाद्या अवयवाचं दुखणं थंडीत असह्य होतं. थंडीत उद्भवणाऱ्या अशाच काही समस्यांचा आणि त्यांवरच्या उपायांचा परामर्श आपण आज घेणार आहोत. सांधेदुखी थंडीच्या दिवसांत मुख्यत: सांधेदुखीची समस्या डोकं वर काढते. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीत सांध्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. सांध्यांना थंड हवा लागू देऊ नये त्याचप्रमाणे पायांना, हातांना मोजे वापरावेत. थंड पाण्यात काम करणं टाळावं. शिळं आणि थंड अन्न घेऊ नये. बटाटे, उसळी, ब्रेड तसेच बेकरीचे पदार्थ, डाळी आणि डाळींच्या पीठाचे पदार्थ टाळावेत. मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा. गरम, ताजे अन्न घ्यावे. थंड पाण्यापेक्षा कोमठ पाणी प्यावं. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीच्या दिवसांत अतिश्रम करणं टाळावं. रात्री झोपताना सांध्यांना एरंडेल तेलाने मालिश करावं. विविध प्रकारचे गुग्गुळ, दशमुळांचा काढा तसेच इतर वनौषधींचा उपयोग वैद्यकीय सल्याने केल्यास सांधेदुखीचा त्रास आपण टाळू शकतो. दमा दम्याचा त्रास असणाऱ्यांना हिवाळा अत्यंत तापदायक ठरू शकतो. थंडीत छातीत कफ साचण्याची शक्यता जास्त असल्याने दम्याचा त्रास वाढू शकतो. म्हणून दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी थंड पाणी, आईसक्रीम, कोल्ड टी तसेच कोल्ड कॉफी तसेच विविध शितपेयं कटाक्षाने टाळावीत. दही, ताक, दूध, मिठाई दम्याच्या त्रासाला आमंत्रण ठरू शकतात त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन टाळावं. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी पाणी सहसा कोमट करून प्यावं. सुंठ आणि मध किंवा आल्याचा रस आणि मध हे मिश्रण दम्याच्या रुग्णांसाठी हिवाळ्यात आरोग्यदायी ठरतं. रात्री झोपताना तसेच सकाळी अंघोळीपूर्वी छातीला तीळतेल, महानारायण तेल लावून दररोज शेक घ्यावा त्यामुळे छातीत साचलेला कफ मोकळा होण्यास मदत होते. आयुर्वेदातील वमन हा उपक्रम दम्याचा त्रास कमी करण्यास मदत करतो. तसेच दम्याचा त्रास असणाऱ्यांनी 2 ते 3 कप पाणी घेऊन त्यात तुळस, अडुळशाची प्रत्येकी दोन पाने टाकावी आणि एक कप काढा राहील अशा रितीने उकळून कोमट काढा रात्री झोपताना किंवा सकाळी घ्यावा. त्याचप्रमाणे कोबी पाण्यात टाकून गरम करून त्याची वाफ घ्यावी. दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्राणायाम, कपालभारतीसारखे श्वसनसंस्थेशी संबंधित व्यायाम करावेत. च्यवनप्राश, सितोपलादी चूर्ण इत्यादी आयुर्वेदिक उपायही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत. तळपायाच्या भेगा हिवाळ्यात अनेकांच्या हातापायांच्या तळव्यांना भेगा पडतात. काही वेळेस या भेगा एवढं उग्ररुप धारण करतात की भेगांतून रक्तही येतं आणि वेदना असह्य होतात. थंडीमध्ये शरिरात रुक्षता म्हणजेच कोरडेपणा येतो आणि हातापायाच्या तळव्यांवरील त्वचा फाटते. त्वचा फाटल्याने भेगा तयार होता आणि त्या दुखतात किंवा अशा भेगांची आग होते. रुक्षान्नाच्या अतिसेवनामुळेही भेगा पडण्याचा आजार बळावू शकतो. म्हणून हातापायांच्या तळव्यांना भेगा पडण्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारात साजूक तुपाचा समावेश करावा. आहारात दूध, तुपासारखे स्निग्ध पदार्थ वाढवावेत. लोणचे, मिरचीचा ठेचा तसेच अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावेत. जागरणामुळेही शरिरात रुक्षता वाढत असल्याने रात्री जागरण करणं टाळावं. रात्री झोपताना भेगांना साजूक तूप लावावे. चंदन, लाख, ज्येष्ठमध त्याचप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध औषधी तेल भेगांवर लावावीत. ज्येष्ठमध साजूक तुपात टाकून पिल्यामुळंही भेगांचा त्रास कमी होण्यास मदत होते. त्वचेची काळजी हिवाळ्यात साधारणपणे रात्री थंड आणि दिवसा कडक उन असं वातावरण असल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. थंडीमुळे त्वचेतल्या तैलग्रंथी निष्क्रीय होऊन त्वचा निस्तेज आणि रखरखीत बनते. चेहऱ्यावर सुरकुत्या, त्वचा फाटणे, ओठ फुटणे अशा तक्रारी वाढतात. म्हणून हिवाळ्यात त्वचेची खास काळजी घ्यावी लागते. घराबाहेर पडताना चांगले विंटरकेअर लोशन वापरावे. असे विंटरकेअर लोशन आयुर्वेदिक असेल तर उत्तमच. अंघोळीनंतर घरगुती उपाय म्हणून खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर क्रीमऐवजी करावा. हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी आहारात थोडे बदल करावेत. मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सतेज दिसतो. त्याचप्रमाणे संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी होतो. रात्री झोपताना साय किंवा तूप घेऊन त्यात चंदन टाकून मालिश केल्यानेही त्वचेला तेज प्राप्त होऊ शकते. * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Uncategorized

ओवा खाण्याचे फायदे

ओवा खाण्याचे फायदे “ओवा“स्वयंपाकात उपयोग होणा-या मसाल्याला औषधी महत्व खुप असते.याचे योग्य उदाहरण म्हणचे ओवा.ओव्याचा वापर हजारो वर्षांपासुन आजारांवर घरगुती उपाय म्हणुन केला जातो.आयुर्वेदानुसार ओवा पचनक्रीया सुधारते. हे कफ, पोट, छाती चे दुखणे आणि कीटकांचे रोगांसाठी फायदेशीर आहे.यासोबतच उचकी,ढेकर या आजारांसाठी फायदेशीर असते.ओव्यामध्ये 7 टक्के कोर्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लोविन, थायमिन, निकोटिनिक अॅसिड कमी प्रमाणात, थोड्या प्रमाणात आयोडिन, साखर, सेपोनिन, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये मिळणारे सुगंधीत तेल 3-4 टक्के असते, 5 ते 6 टक्के मुख्य घट थाइमोल असते. 1. पोट बिघडल्यावर ओवा चावुन खावा. यानंतर एक कप गरम पाणी प्या. 2. 10 ग्रॅम सुंठ, 5 ग्रॅम काळे मीठ, 2 ग्रॅम जीरे चांगल्या प्रकारे मिश्रण करा. या मिश्रणातील 3 ग्रॅम प्रमाण कोमट पाण्यत टाकुन दिवसातुन 4-5 वेळा घ्या. पोट दुखी होणार नाही. 3. पोटात जंतु असतील तर काळ्या मीठासोबत अर्धा चमचा ओवा खा. हे काही वेळा नियमित खाल्ल्याने पोटातील जंत नष्ट होतील. 4. 3 ग्रॅम ओवा आणि अर्धा ग्रॅम मीठ खाल्ल्याने हृदयाचे रोग दुर होतील. 5. गॅस झाल्यावर थोडी हळद, ओवा आणि एक चिमुट काळे मीठ मिळवुन खा. यामुळे लवकर आराम मिळेल. 6. 5 ग्रॅम ओवा पाण्यात टाकुन सेवन करा. महिन्यातुन पाच वेळा असे केल्याने मुतखडा कधीच होणार नाही आणि असेल तर निघुन जाईल. 7. तोंडले,ओवा,अद्रक आणि कापुर यांना समान प्रमाणात घेऊन कुटून घ्या.एका सूती कपड्यात गुंडाळुन थोडे गरम करा,सुजलेल्या भागावर हळु-हळू शेकल्यामुळे सुज कमी होईल. 8. दारुची सवय मोडण्यासाठी दिवसातुन प्रत्येक दोन तासाला ओवा चावण्यास द्या. लवकर परिणाम दिसेल. 9. ओवा भाजुन बारीक करा. या मिश्रणाने रोज दोन- तीन वेळा दात घासा. तुमचे दात मजबुत आणि चमकदार होतील. दात दुखत असल्यास ओवा पाण्यात उकळुन कोमट पाण्याने गुळण्या करा. दात दुखणे थांबेल. 10. आजवान बारीक करुन खोब-याच्या तेलात टाका आणि हे तेल कपाळावर लावा , डोके दु:खी थांबेल. 11. ओवा भाजुन एका कपड्यात गुंढाळा आणि रात्री झोपतांना उशा जवळ ठेवा, दमा, सर्दी, खोकला असणा-या लोकांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही. 12. दम्याच्या रोग्यांना रोज ओवा आणि लवंगच्या समान प्रमाण असलेले चुर्ण रोज दिले तर फायदा होतो. ओवा एखाद्या मातीच्या भांड्यावर जाळुन त्याचा धुर केला तर दम्याच्या रोग्यांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही. 13. ओव्याच्या रसामध्ये दोन चिमुट काळे मीठ मीळवुन सेवन करा आणि नंतर गरम पाणी प्या. खोकला बरा होईल. 14. कोरड्या खोकल्यापासुन त्रस्त असाल तर ओव्याचा रस मधात मिळवुन दिवसातुन 2 वेळा एक-एक चमचा सेवन करा. 15. गळ्यात खाज असेल तर बोराचे पाने आणि ओवा हे सोबत एकाच पाण्यात उकळा आणि गाळुन हे पाणी प्या. 16. अद्रकच्या रसामध्ये थोडे चूर्ण आणि ओवा मिळवून खाल्ल्याने खोकल्यापासुन आराम मिळेल. 17. ओवा विड्याच्या पानामध्ये ठेवून चावा. असे केल्याने कोरड्या खोकल्यापासुन आराम मिळेल. याव्यतिरिक्त ओवा खाल्ल्याने गळ्याची सूज आणि दुखणे थांबेल. 18. नाक बंद झाल्यावर ओव्याला बारीक करुन कपड्यात गुंडाळुन वास घ्या, आराम मिळेल. 19. जेवणा नंतर ओवा आणि गुळ सोबत खाल्ल्याने सर्दी आणि ॲसिडिटीपासुन आराम मिळेल. 20. 2 ते 3 ग्रॅम ओवा दिवसातुन तीन वेळा घ्या. सर्दी आणि डोकेदुखीपासुन आराम मिळेल. 21. पानच्या पाणांसोबत ओवा चावा, गॅस, पोटातील मुरडा आणि ॲसिडीटीपासुन आराम मिळेल. 22. 1 ग्रॅम भाजलेल्या ओवा पानामध्ये टाकुन चावल्याने अपचन पासुन आराम मिळेल. हिवाळ्यात शरीराला थोडी गर्मी देण्यासाठी थोडा ओवा चावा आणि पाण्यासोबत सेवन करा. 23. 1 चमचा ओवा आणि एक चमचा जीर एकसोबत भाजुन घ्या.मग हे पाण्यात उकळुन गाळुन घ्या. या पाण्यात साखर मिळवून प्यायल्याने ॲसिडीटीपासुन आराम मिळेल. 24. कॉलरा झाल्यावर कापुर सोबत ओवा मिळवून खाल्ल्याने आराम मिळेल.झोप न येण्याची समस्या असेल तर 2 ग्रॅम ओवा पाण्यासोबत सेवन करा. झोप चांगली येईल. 25. खाज येत असेल किंवा कुठे जळाले असेल तर, ओवा बारीक करुन तेथे लावा आणि 4-5 तास लावुन ठेवा. यामुळे फायदा होईल.धन्यवाद!!! * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Uncategorized

च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे

च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे च्यवनप्राशला आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे. च्यवनप्राश बनवण्यासाठी आवळा व इतर 40 रसायनद्रव्ये, रक्तशुद्धीकर द्रव्ये व त्रिदोषशामक द्रव्ये वापरली जातात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात. च्यवनप्राश हे लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांसाठी अतिशय फायदेशीर आहे. च्यवनप्राश प्रभावी होण्यासाठी त्यात वापरले जाणारे घटक उत्कृष्ट प्रतीचे असणे आवश्यक असते शिवाय ते बनवण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीचा वापर करावा. च्यवनप्राशचा मुख्य घटक हा आवळा आहे. आवळा हे एक उत्तम प्रकारचे व सहज उपलब्ध होणारे आयुर्वेदिक हे औषध आहे. आयुर्वेदामध्ये आवळ्याला वयःस्थापन द्रव्य मानले जाते. त्यामुळे वाढत्या वयामुळे शरीराची होणारी झीज कमी प्रमाणात व्हावी व तारुण्य टिकवण्यासाठी आवळा अतिशय उपयुक्त आहे. भारतीय संस्कृतीमध्ये च्यवनप्राशला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर याचा समावेश आपल्या दैनंदिन आहारात करण्याचा सल्ला देतात. चला तर जाणून घेऊया च्यवनप्राशचे खाण्याचे मुख्य फायदे कोणते आहेत व त्याचे सेवन कसे करावे: च्यवनप्राश सेवन करण्याचे काही नियम: बरेच वेळी लोकांचा गैरसमज असतो कि च्यवनप्राश केवळ हिवाळ्यामध्ये सेवन करावे. परंतु, आयुर्वेदामध्ये याला संपूर्ण वर्षभर सेवन करण्याच्या सल्ला दिला गेला आहे. 5 वर्षाखालील मुलांना पाव चमचा, 10 वर्षाखालील मुलांना अर्धा चमचा व त्यानंतर 1 चमचा याप्रमाणे च्यवनप्राश दररोज सेवन करावे. वयाच्या पस्तिशीनंतर त्यात चांदी, सुवर्ण अशी द्रव्ये मिसळून तयार केलेले च्यवनप्राश सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते. गर्भवती व स्तनपान देणाऱ्या महिलांनी देखील याचे सेवन करावे. त्यामुळे मुलांना आवश्यक ती पोषकतत्त्वे मिळण्यास मदत होते. परंतु च्यवनप्राश तुपासोबत घेऊ नये. कारण तूप हा च्यवनप्राश चा एक घटक आहे. त्यामुळे तुपासोबत घेतल्याने वजनवाढीची समस्या उद्भवू शकते. च्यवनप्राश कोणत्या वेळी सेवन करावे? आयुर्वेदामध्ये च्यवनप्राश व कोणतेही आयुर्वेदिक औषध सकाळी घेणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. आयुर्वेदिक डॉक्टर च्यवनप्राश सकाळी रिकामे पोटी खाण्याचा सल्ला देतात. नाश्त्यापूर्वी एक चमचा च्यवनप्राश गरम दुधासोबत घेतल्याने याचा चांगला फायदा होतो. तसेच झोपण्यापूर्वीदेखील आपण १ चमचा च्यवनप्राश गरम दुधासोबत घेऊ शकतो. च्यवनप्राश सेवन करण्याचे फायदे: ह्यातVit A आणि Vit C चे प्रमाण असते . ह्याचे सेवन केल्याने प्राणवह स्रोतसांचे (फुफ्फुसांचे) रोग दूर ठेवण्यास मदत होते( जसे – सर्दी, खोकला) च्यवनप्राशसेवन केल्याने व्याधीक्षमत्व वाढते. (Immunity Booster.) रोजसेवन केलेल्या अन्नाचे पचन नीट होण्यास मदत करते. ह्याच्या सेवनाने तारुण्य टिकवण्यासाठी मदत होते.(Anti Ageing). बुद्धीवर्धक असल्याने लहान मुलांसाठी उपयुक्त आहे. Tonic for reproductive System. परीपुर्णशारीरीक वाढीसाठी उपयुक्त. श्वसनाच्यासमस्या कमी करते रोगप्रतिकारशक्तीसुधारते स्त्रियांमध्येमासिक पाळीच्या समस्या दूर करते व पाळी नियमित करण्यासाठी मदत करते. ब्लडप्रेशर नियंत्रित करते रक्तशुद्ध करते, हीमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते कोलेस्ट्रॉलनियंत्रित करते 😃स्वस्थ रहा मस्त रहा😃 अशाच उपयोगी माहीतीसाठी संपर्क करा – 7796775000 डॉ. अविनाश देवरे श्री साई आयुर्वेदिक क्लिनिक पत्ता : कोहिनुर आर्केड ,१ मजला , शॉप नं ११६ टिळक चौक , निगडी पुणे-४४ Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? पावसाळ्यातील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी

Scroll to Top