infertilityayurved

blog

blog, Uncategorized

Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे)

Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) तिल कफ और पित्त को कम करने में मदद करता है।तिल शरीर को मजबूत बनाते हैं और बालों के लिए बहुत फायदेमंद होते हैं। * तिल त्वचा के स्वास्थ्य के लिए अच्छे होते हैं, शरीर में कहीं भी अल्सर के लिए फायदेमंद होते हैं, दांतों के लिए अच्छे होते हैं, भूक और दिमाग की शक्ति बढानेवाला है * आयुर्वेद में तिल का उपयोग विभिन्न तरीकों से किया जाता है। सभी प्रकार के तेलों में तिल के तेल का उपयोग देखा जाता है। यह सिद्ध हो चुका है कि तिल का तेल न केवल अभ्यंग के लिए उपयोगी है, बल्कि इसे अन्य उपचारों जैसे कि बस्ती, शिरोबस्ती आदि के लिए भी अनुशंसित किया जाता है। * कई लोगों का अनुभव है कि बवासीर से पीड़ित व्यक्ति यदि तिल को पानी में भिगोकर उससे बने पेस्ट में मक्खन मिलाकर भोजन से पहले 2-3 दिन तक सेवन करें तो रक्तस्राव बंद हो जाता है।  – तिल को बालों के स्वास्थ्य के लिए अच्छा माना जाता है। ऐसा कहा जाता है कि अगर बालों में काले तिल का तेल लगाया जाए तो वे समय से पहले सफेद नहीं होते, बल्कि काले, घने और मुलायम बने रहते हैं। * सम्पूर्ण स्वास्थ्य के लिए तिल हमेशा आपके रसोईघर में होने चाहिए। मसालों में प्याज और लहसुन का उपयोग करने की अपेक्षा तिल को विभिन्न बीजों के साथ उपयोग करना भी बेहतर है। -पिसे हुए तिल, भुना हुआ सूखा नारियल, करी पत्ता, सूखी लाल मिर्च आदि से बनी तिल की चटनी खाना उत्तम है| इस मौसम में नियमित रूप से तिल के लड्डू और तिल की चिक्की खाना भी अच्छा होता है  तिल के लड्डू शरीर को कैल्शियम और आयरन से भर देते हैं और सर्दियों में शरीर को समग्र शक्ति प्रदान करने तथा गर्म रखने में मदद करते हैं।  ऐसे गुणयुक्त तिल खाए और स्वास्थ्य का लाभ उठाए तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला https://chat.whatsapp.com/D2JkOyBrBFk94OL1veCsNZ ।।हर घर आयुर्वेद।। ।।हर दिन आयुर्वेद।। आरोग्य तज्ज्ञ वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु) वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44  श्रीसाई आयुर्वेदिक पंचकर्म रूग्णालय.F1-बिल्डिंग, फ्लॅट-B3. दुसरा मजला, शिव साडीच्या वर, सेक्टर-०९. हॉटेल शबरी जवळ, वाशी-४००७०३, नवी मुंबई. शाखा- मुंबई- वाशी । दादर. पुणे- निगडी ।बाणेर । मोशी.    हेल्पलाइन नं: 7796775000 9422558509 9822634478 https://youtu.be/oopuj-isLZkhh Related Articles How to Lose Weight After Diwali: Expert Tips and Tricks | ि वाळीनतं र वाढलेलेवजन कसेकमी करा ? LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

blog

LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) 1. What is AMH? AMH is an anti-mullerian hormone. It is a protein hormone made by the cells lining the follicles(sacs that hold the eggs) in females & the testicles( or testes) in males.AMH is an important hormone for the sexual development of both males & females & plays different roles in both genders. A good AMH level for pregnancy is between 1.0 and 4.0ng/ml. 2. What is low AMH & high AMH? LOW AMH: Low AMH & pregnancy are often discussed simultaneously. This is because low AMH levels signify a decreased or very low number of eggs in the ovarian reserve. HIGH AMH: High levels of AMH mean more antral follicles & a higher yield of oocytes during ovarian stimulation which can ultimately lead to the formation of more embryos. An important thing to remember here is that AMH is only a market of the number of eggs & not their quality which is more important in forming good-quality embryos & ultimately a successful pregnancy. 3. Causes of low AMH & high & AMH? LOW AMH CAUSES:There are various factors affecting the AMH level in a woman’s ovaries :a) Stress levelb) Age factorc) Vitamin deficiency (especially vit d )d) Eating habitse) Birth control pills HIGH AMH CAUSES :A lack of sensitivity to injection FSH: if someone’s ovaries don’t respond well to follicles stimulating hormone( FSH) which helps eggs grow & mature. AYURVEDIC TREATMENT : 1. Pushpadhanva rasa (250mg): before lunch & before dinner.2. Suvarna Malini Vasant rasa(gold) 125 mg:1 tab in the morning empty stomach with warm milk.3. Tapyadi loha with rajat (bhasma)125mg :1 tablet after lunch & 1 tab after dinner. PANCHAKARMA THERAPIES IN LOW AMH: 1. UTTRABASTI with phalasarpi ghrit using 1.5cc syringe for 3 days in each cycle continue upto6 to 8 months.2. VIRECHAN KARMA:A) Ghrutapan with Ashok Ghrita followed by 5 to 6 days.B) Sarvang snehan swedan for 3 to 4 days.C) Virechana dravyas withichhabhedi rasa or Trivrutta avaleha.3. YOG BASTI:To be done for 8 dasy followed by sarvang snehan swedan with alternate day Anuvasan & Niruh Basti.Anuvasan basti with saptabhavit ksheerbala oil, Niruh basti with Dashmool+ prajasthapan gana sidda qwath.4. NASYA KARMA:With shatavari ghrita in morning empty stomach. LIFESTYLE MANAGEMENT: 1. STRESS MANAGEMENT: It’s important to manage stress through meditation, exercise &therapies to help improve fertility health & potentially improve AMH levels.2. ADEQUATE SLEEP: Ensure you get at least 7-8 hours of sleep each night lack of sleep can lead to hormonal imbalance.3. HEALTHY DIET: Adopt a healthy diet following a healthy diet can help to improve your ovarian reserve you can include the following things- fresh fruits, vegetables, nuts, whole grains, eat organic, reduce refined carbs, avoid processed foods, limit sugar intake, avoid packaged food, etc.4. MAINTAIN HEALTHY WEIGHT: Your weight influences your AMH level so keep it in a healthy range.5. Avoid smoking and Excessive Alcohol: Smoking and Excessive Alcohol consumption may harm fertility, so it’s advisable to avoid or limit these substances. A. What should you eat or include in your diet? 1. Adopt a healthy Diet.2. Fresh fruits and vegetables3. Nuts, Whole grains.4. Eat Organic.5. Beans & lentils, Seeds, Dry fruits, etc…6. Green Leafy vegetables. B. What to avoid? 1. Reduced refined carbs.2. Avoid processed food.3. Limit Sugar intake.4. Avoid Packaged food5. Ready to eat food. EFFECTS OF ALCOHOL AND SMOKING ON FERTILITY. 1. From disrupting hormone production to impairing sperm quality and motility. Smoking can make it difficult to initiate the process essential four successful conception.2. Hormonal Imbalance: Prolonged alcohol/smoking consumption disrupts the delicate balance of hormones crucial for reproductive function3. Drinking alcohol targets sperm. morphology & sperm producion.4. Smoking releases toxins that primarily hamper sperm mobility and seminal fluid quality and affect or cause Brechile dysfunction.5. Alcohol-induced oxidative stress can damage. Sperm DNA, altering their morphology & Increasing the likelihood of genetic abnormalities. in offspring. WE HAVE MORE THAN 2000 CASES SUCCESSFUL OF LOW AMH. Patient Testimonials https://youtu.be/-kgyHbOeOAYhttps://youtu.be/6zNwCI-_0HQ Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Let’s learn how to prevent from chikungunya | Dr. Avinash Deore

blog

Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) नवरात्री हा एक धार्मिक उत्सव असून तो देवी दुर्गेच्या ९ रूपांची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो. या काळात देवीच्या पुजेबरोबरच भक्तजन उपवास करुन देवीची आराधना करतात. आयुर्वेदानुसार, नवरात्रीमध्ये उपवास करण्याला बरेच महत्त्व आहे. कारण यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य सुधारते. नवरात्री ही देवी शक्तीची आराधना करताना आपलं शारीरिक बल वाढावं म्हणून उपवास योग्य पद्धतीने करायला हवा. (Navratri Fasting importance in ayurveda). या काळात, पाच तत्त्वांचे संतुलन राखणे आवश्यक आहे. म्हणूनच नवरात्रीच्या दरम्यान, ताज्या फळांचा, शुद्ध धान्यांचा आणि भारतीय मसाल्यांचा उपयोग करुन उपवास केले जातात. हे पदार्थ शरीराची क्षमता वाढवतात आणि शक्ती देतात. याबरोबरच नवरात्रीमध्ये ध्यान केल्याने मनाची शुद्धता साधता येते. ध्यानाच्या माध्यमातून आंतरीक शांती प्राप्त करतात, ज्यामुळे आत्मज्ञान आणि आध्यात्मिक जागरूकता वाढते. ध्यानामुळे आत्मसंयम साधता येतो, ज्यामुळे नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवता येते. उपवासामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडतात आणि ऊर्जा वाढण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो आणि शरीरातील आत्मरक्षण शक्ती वाढते. उपवासाच्या काळात हलका आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये फळे, शेंगदाणे आणि शुद्ध धान्य यांचा समावेश असतो. हे आयुर्वेदाच्या तत्त्वानुसार उत्तम मानले जाते. या काळात केल्या जाणाऱ्या उपवासामुळे मन आणि आत्मा शुद्ध होतो, ज्यामुळे ध्यानाची शक्ती वाढण्यास मदत होते. या पदार्थांतून मिळेल ऊर्जा 1. राजगिरा पिठ: हे पित्त आणि वात संतुलित करण्यास मदत करते. 2. सामक तांदूळ (वरई): यामध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्त्व असतात ज्यामुळे ऊर्जा मिळते. 3. सिंगा (शिंगाडा): हायड्रेटिंग गुणधर्मामुळे, हे शरीरात ताजेपणा आणते. 4. फळे: सफरचंद, केळी, पेरु आणि मोसंबी यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. लंघनाचे महत्त्व- आयुर्वेदात लंघन म्हणजे उपवास करणे किंवा हलका आहार घेणे. लंघनामुळे शरीरातील पचनक्रिया आणि विषाक्त पदार्थांचे शुद्धीकरण साधता येते. लंघनामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि शरीराची कार्यक्षमता वाढते. लंघन हे आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण यामुळे आहाराच्या आवडीनिवडीवर नियंत्रण ठेवता येते. लंघनाचे फायदे – 1. पचन सुधारते – पचनसंस्थेवरचा ताण कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते. 2. विषाक्त पदार्थांचा नाश – शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. 3. ऊर्जा आणि चैतन्य वाढवते – शरीराला ऊर्जा मिळते व ताजेतवानेपणा येतो. 4. रोग निवारण – लंघनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि विविध आजारांपासून संरक्षण होते. https://chat.whatsapp.com/D2JkOyBrBFk94OL1veCsNZ ।।हर घर आयुर्वेद।। ।।हर दिन आयुर्वेद।। आरोग्य तज्ज्ञ वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु) वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 श्रीसाई आयुर्वेदिक पंचकर्म रूग्णालय.F1-बिल्डिंग, फ्लॅट-B3. दुसरा मजला, शिव साडीच्या वर, सेक्टर-०९. हॉटेल शबरी जवळ, वाशी-४००७०३, नवी मुंबई. शाखा- मुंबई- वाशी । दादर. पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. हेल्पलाइन नं: 7796775000 9422558509 9822634478 https://youtu.be/oopuj-isLZkhh Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Let’s learn how to prevent from chikungunya | Dr. Avinash Deore

blog

Let’s learn how to prevent from chikungunya | Dr. Avinash Deore

Let’s learn how to prevent from chikungunya | Dr. Avinash Deore चिकनगुनिया पावसाळ्यात साथीचे आजार होतात, सध्या सगळी कडे व्हायरल तापाची साथ सुरु आहे, तिच्यापासून बचाव कसा करायचा ते जाणून घेऊ.चिकनगुनिया हा असा व्हायरस आहे ज्याच्या शरीरात येण्यामुळे ताप येतो. चिकनगुनिया चे मुख्य लक्षण हे ताप (temperature) आहे. हा व्हायरस सर्वात आधी तंजानिया येथे आढळून आला होता. जेव्हा त्या ठिकाणी हा वायरस आढळून आला त्यानंतर त्यावर तिथे रिसर्च करून त्याला चिकनगुनिया असे नाव देण्यात आले. चिकनगुनिया हा काही जास्त मोठा आजार नाही किंवा तो नीट होणारच नाही असे देखील नाही. याचे अनेक असे उपाय आहेत ज्यामुळे हा आजार ठीक होऊ शकतो. कुठलाच आजार मोठा नसतो फक्त आपले सकारात्मक विचार आणि त्या आजाराविरुद्ध लढण्याची ताकद या दोनच गोष्टी आपल्याला आजार पळवून लावू शकतात. हा आजार एवढा घातक नाही की ज्यामुळे आपला मृत्यू होऊ शकेल. सामान्य व्यक्ती या आजारातून पूर्णपणे बरा होऊ शकतो, फक्त थोडा वेळ द्यावा लागतो. चिकनगुनियाची कारणे (Chikungunya Causes) या आजाराचे मुख्य कारण पहिले तर हा आजार मच्छराच्या चावल्यामुळे होतो. हे मच्छर आपल्या आसपास साठलेल्या घाणीमुळे तयार होतात. यामध्ये हजारो डास तयार झालेले असतात, त्यामधील काही अतिशय विषारी असतात. चिकनगुनिया हा आजार वेळेस एडेस एलबोपिक्टस (Aedes Albopictus) तसेच एडेस इज्यप्ती (Aedes Aegypti) नावाच्या मच्छरने चावल्यास होतो. हा व्हायरस मुख्यता जनावरांमध्ये किंवा पक्षांमध्ये असतो व तिथूनच आजूबाजूच्या परिसरात पसरतो. चिकनगुनिया ची लक्षणे (Symptoms of Chikungunya) चिकनगुनिया मध्ये एक विशिष्ट प्रकारचा ताप व्यक्तीला येतो . परंतु सुरुवातीच्या काळामध्ये असे काही लक्षणे आढळून येतात जे पुढील प्रमाणे आहेत. >>सुरुवातीच्या काळामध्ये हात आणि पायामध्ये खूप वेदना होतात. या वेदना मुख्यत्वे सांध्यांमध्ये जास्त होतात, याचबरोबर डोकेदुखी देखील वाढते.रुग्णाला थंडी वाजून येते व त्यानंतर तीव्र असा ताप येतो. हा ताप पाच-सहा दिवस असाच कमी जास्त होत राहतो. ताप 102 ते 103 डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतो. >> या व्हायरस ने मुटेशन केल्यामुळे नाक लाल होणे ,नाकावर काळा चट्टा उठणे ,चेहऱ्या वर रॅश येणे हि लक्षणे देखील अढळून येतात . >>हातापायांना सूज येते व खूप वेळा शरीरावरती दाने दाने (Spots) आढळून येतात.या आजाराची लक्षणे कमीत कमी दहा ते बारा दिवस राहतात. या आजाराचे बरेच पेशंट पाहिल्यानंतर असे लक्षात आले की सुरुवातीच्या सहा दिवसांमध्ये या आजाराचा खूप जास्त त्रास होतो. नंतरच्या पाच सहा दिवसांमध्ये ताप हळूहळू कमी होऊन आजार बरा होतो. >>तापाचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे या आजारात शरीरामधील पाचनक्रिया(Metabolism) खूप कमी होते,त्यामुळे खाल्लेले पचत नाही व त्यामुळे अशक्तपणा येण्याची शक्यता असते. आयुर्वेदिक उपाय >> वरील रुंगांमध्ये ऍलोपथ्य सोबत आयुर्वेदिक उपचार देखील त्वरित सुरु करावे ,त्या मध्ये गुळवेल चा काढा सकाळ ,संध्याकाळ घेणे. ताप आल्यासमहासुदर्शन काढा ३ चमचे सकाळी संध्याकाळ आणि रात्री घेणे . >>सोबत सांधे दुखी चा तीव्र त्रास असल्यास अमृतारिष्ट हे औषध ३-३ चमचे ३ वेळा घेणे. >>सोबत गरम पाण्याच्या पिशवी ने सर्व सांधे शेकून घेणे,आहारामध्ये पचण्यास हलका आहार घेणे . >> या काळामध्ये आराम करणे अपेक्षित आहे, लक्षणांचा तीव्रतेनुसार आयुर्वेदिक तज्ञांकडून सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार सुरु करावे . अशा पद्धतीचे ५०० च्या वर रुग्णांना आम्ही वेदने मधून मुक्त केले आहे https://chat.whatsapp.com/D2JkOyBrBFk94OL1veCsNZ ।।हर घर आयुर्वेद।।।।हर दिन आयुर्वेद।। आरोग्य तज्ज्ञ वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44श्रीसाई आयुर्वेदिक पंचकर्म रूग्णालय.F1-बिल्डिंग, फ्लॅट-B3. दुसरा मजला, शिव साडीच्या वर, सेक्टर-०९. हॉटेल शबरी जवळ, वाशी-४००७०३, नवी मुंबई.शाखा- मुंबई- वाशी । दादर.पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. हेल्पलाइन नं: 779677500094225585099822634478https://youtu.be/oopuj-isLZkhh Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

blog

Monsoon and Debilitating Asthma

पावसाळा आणि दमविणारा दमा जेष्ठ महिना संपून आषाढ सुरू झाला की पावसाळी वातावरण रंगू लागतं. आषाढातल्या भरून आलेल्या ढगांबरोबर कवि-कल्पना जुळू लागतात. पण डॉक्टरांना मात्र या ढगांबरोबरच अनेक आजारांच्या सूचना मिळतात. अलर्जी /दमा भरून आलेलं आभाळ म्हणजे दमेकऱ्यांसाठी संकटच असतं. श्वास घेताना कोंडल्यासारखं वाटणं, धाप लागणं, छातीत दुखणं, अस्वस्थ वाटणं, ताप येणं, थकवा येणं असे त्रास होऊ शकतात. मुलांना बाळदमा असेल तर असे त्रास जास्त सतावतात. घरगुती उपाययोजना आरोग्यसंस्कृती दम्याचा त्रास असताना नेब्युलायझर, पंप, औषधाचा वाफारा, श्वासनलिका विस्फारक औषधं आदी नेहमीची उपाययोजना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पुढील काही उपाय रुग्णाला बरं वाटण्यासाठी करता येतात. १. एक वाटी तेल (तीळाचं) कोमट करून त्यात सैंधव मीठ घालावं. सैंधव मीठयुक्त अशा या तेलाने छातीला फासळ्यांच्या दिशेने हळूवारपणे मसाज करावा. तवा गरम करून त्यावर फडका ठेवावा आणि या गरम फडक्याने छाती शेकावी. यामुळे छातीतला कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते. २. गरम पाण्याची वाफ घेणं. साध्या गरम पाण्याच्या वाफेने साठलेला कफ मोकळा होण्यास मदत होते. विशेषतः मुलांना कफ किंवा सर्दी झाल्यास एका मोठ्या भांड्यात उकळलेले पाणी घ्यावं. ते भांडं उंच बादलीच्या तळाशी ठेवावं आणि मुलांना बादलीच्या तोंडाजवळ पोहोचणारी वाफ घ्यायला प्रोत्साहित करावं. मुलाच्या नाकातून पाणी येऊ लागतं. सर्दी वाहून जाते आणि दम्यापर्यंत जाण्याची शक्यता कमी होते. कफ दाटणं तसंच सुकून जाणं यामुळे दम लागणं वाढू शकतं. त्याचीसुद्धा विशेष काळजी घ्यावी. ३. ‘दम’ लागल्यावर काय करावं? श्वासाचा दमा किंवा झाल्यावर योग्य त्या वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. या दम्याच्या तडाख्यामुळे रात्री झोप येत नाही. त्यामुळे विशेषतः आडवं झोपणं शक्य होत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी बसून काढाव्या लागतात.पहाटे अस्वस्थता वाढते. रात्रीच्या रात्री मग अक्षरशः अशावेळी उशी समोर ठेवून त्यावर डोकं ठेवून विश्रांती घ्यावी. संपूर्ण आडवं न होता छाती, डोळे वरच्या बाजूला करून थोडी आरामदायक अवस्था येऊ शकते. खाणं-पिणं पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. खाण्यात पचण्यासाठी जड पदार्थ टाळावेत. सुंठ, मिरी, पिंपळी, दालचिनी आदी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करावा. कुळीथ पिठाचं पिठलं, हिरव्या मुगाचं वरण, शेवग्याच्या शेंगांची आमटी, मिक्स पिठांची भाकरी, कोवळ्या मुळ्याचे किसून केलेले पराठे, वेगवेगळ्या फळभाज्यांचे सूप या गोष्टी जेवणात समाविष्ट करायला हव्या. तसंच फ्रीजमधले थंड पदार्थ, दही, तळलेले तसंच मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ आणि ज्या पदार्थांची अॅलर्जी आहेत असे पदार्थ टाळावेत. घरामधल्या वातावरणात बदल –दमट वातावरणात दमवणाऱ्या दम्याचा हल्ला होतो. निसर्गातलं वातावरण आपल्याला बदलता येत नसलं तरी घरामधलं वातावरण मात्र नक्कीच बदलू शकतो. त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. १. घरातल्या एसीसारख्या विद्युत उपकरणांची योग्य ती निगा राखावी.पावसाळयात AC वापरू नये. २. दम्याच्या रुग्णांच्या उशीचे कवर रोज बदलावेत. ३. पावसाच्या पाण्यामुळे घरात कुठे गळती होत असेल तर त्यावर योग्य ती उपाययोजना करावी. ४. घरात भिंतींना ओल येत असेल तर दमटपणा वाढून दम्याचा त्रास वाढू शकतो. यासाठी या ओल येण्याला प्रतिबंध करावा. ५. गुग्गुळ-राळ-वेखंड-अगरु इ.पदार्थ जाळून धूपन करावं. पावसाळ्यात केलेलं धूपन अनेक आजारांना प्रतिबंध करतं. ६. उदबत्ती किंवा इतर तत्सम सुगंधांची काहीजणांना (धुळ,धुर) अॅलर्जी असते. तरी अशा गोष्टींचा वापर प्रकर्षाने टाळावा. ७. पाळीव प्राणी, विशेषतः मांजरांच्या अंगावरचे केस दमेकऱ्यांना त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहणं केव्हाही उत्तम! ८. पावसाच्या पाण्यात भिजणं आणि नंतर केस ओले राहणं यामुळं दमा उफाळू शकतो. ते टाळावं. वमन दम्याच्या त्रास असणाऱ्यांनी आयुर्वेद पंचकर्म तज्ज्ञांच्या सहाय्यांने वमन करून घ्यावं. त्यामुळे सर्दी, खोकला, अॅलर्जी, ताप, दमा या त्रासांना प्रतिबंध होतो. बस्तिऔषधी तेलाचे व औषधी काढयाचे हे शरीरातील वात व कफ कमी करुन दम्याचा त्रासकमी करु शकतो. ज्यांना हा त्रास होतो त्यांनीबस्ति चिकित्सा करावी व ज्यांना हा त्रास होत नाही त्यांनीही भविष्यात त्रास होऊ नये म्हणून बस्ति करावी. * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर.पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

blog

महाराष्ट्रियन जेवण एक संतूलित आहार

महाराष्ट्रियन जेवण एक संतूलित आहार चांगला आहार हाच प्रमूख चांगल्या आरोग्याचा स्रोत आहे. मग त्या अन्नात अश्या गोष्टि असायला पाहिजे कि, ज्याने ते जेवण रूचकर व चवदार सोबत, पौष्टिक, बलदायी, आरोग्यदायी असले पाहिजे.  तेव्हा आपले महाराष्ट्रियन जेवण या अनुषंगाने अतिशय उत्तम स्रोत आहे.##.. आपल्याला जेवणातून,पिष्टमय पदार्थ, प्रोटिन्स, स्निग्ध पदार्थ (वसा, फँटस् तूप, तेल, मेद) विटामिन्स, आणि क्षार मिळायला हवेत…. आणि.. आयुर्वेद म्हणते कि, जेवणांत गोड, आंबट, तिखट, खारट, कडू, तुरट, असे षड(सहा) रस मिळायला हवेत,तर ते परिपूर्ण जेवण असतं## आपले मराठी जेवण शास्रशुद्ध असते. वरणांतील डाळ प्रोटिन्सची पूर्तता करते. यात घातलेला गूळ लोह देतो. तर चिंचेचा कोळ लोह पचवायला मदत करतो….. भात, पोळी, भाकरी, यांतून पिष्टमय पदार्थ मिळतात. त्यातून शरिराला उर्जा मिळते.## वरणभातावर पडणारी साजूक तूपाची धार, स्निग्धता देऊन आतडे नरम ठेवते. आणि अन्न पचवण्यास मदत करते… वेगवेगळ्या भाज्यांमधून मिळणारे मिनरल्स, आणि खनिजे पोषक ठरतात.## थाळीतले डावीकडचे पदार्थ मीठ, लिंबाची फोड,पंचामृत,मिरचीचा ठेचा, थोडी कोशिंबिर, हे सर्व तोंडाला रस सुटून जेवण पचवतात.## … लिंबू – Vit C ची.पूर्ती करते, तर हिरवी मिरची प्रतिकारशक्ती वाढवते… जंतूनाशक म्हणून..## पंचामृतातले तीळ, शेंगदाणे, खोबरे, वंगण म्हणून उपयोगी ठरते. आणि स्निग्धता देते. अधे मध्ये जिभेला जिवंत करायला या डाव्या बाजूला असणार्या पदार्थाचा उपयोग ठरतो….. मिठ मात्र चवीचे खायचे..## मसाले भातातले काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे शरिराला उर्जा देतात. तर मसाले सर्दि, कफ, विकारांवर अंकूश ठेवतात…. पापडातला उडिद बळ देतो,ताकद देतो…. वाटीतला मठ्ठा, ताक हे मन प्रसन्न करून मानसिक ताण कमी करते..…. ## पातळभाजीतले शेंगदाणे, खोबरे व फोडणीतला… हिंग..अन्नाचे पचन करण्यास मदत करतो… सोबत.. मेतकूट म्हणजे अनेक डाळींचा संगम, ज्यामुळे प्रोटिन मिळून ताकद वाढते.## . आणि सर्वात शेवटी गोड म्हणून शिरा, श्रीखंड, आमरस, हे तृप्ती देउन, मानसिक ताण, कमी करते.## मग मात्र हे आकंठ, जेवण पचावे म्हणून व त्यासाठी कँलशिअमसहित,, अनेक द्रव्ये उपलब्ध व्हावीत म्हणून। ( कात, चूना, सुपारि, लवंग, वेलचि, खोबरे, गुलकंद,) असे अनेक पदार्थ घातलेला ,, त्रयोदशगुणि,, विडा हा हवाच खायला !!! …## अन्न हे परब्रम्ह, उदरभरण नव्हे हे जाणिजे यज्ञकर्म,…..🌾🌾🍀🌾 * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर.पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

blog

आवळा खाण्याचे फायदे

आवळा खाण्याचे फायदे ### आवळा…आमलकी….आयुर्वेदात आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानले आहे. संस्क्रृतमध्ये-आमलकी, व इंग्रजित-एम्ब्लिका मायरोबेलान असे म्हणतात.. आवळा हा शरीर पोषणाचं काम करतो म्हणून आयुर्वेदात याला .. “धात्रि”म्हणतात.. वार्धक्य अवस्था टाळुन चिरतरुण ठेवतो म्हणून याला “वयस्था” असेही म्हणतात.. आवळा हा रक्तदोषहारक, पित्तशामक,सारक व रूचकर आहे..…. ..###आवळा हा आम्ल-मधुर रसाचा, शीत-वीर्यात्मक व मधुर विपाकी असल्याने शरिरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. रक्तविकारात उदा.-नाकाचा घोळणा फुटला असेल तर,शौचातुन रक्त जात असेल तर, मूळव्याधितून रक्त जात असेल तर,तसेच स्रियांच्या मासिक पाळीत अतिरक्तस्राव होत असेल तर. आवळाचूर्ण , आवळारस घेतल्यास आराम पडतो..।। आयुर्वेद।।…🍈 जर डोकेदुखीचा त्रास असेल तर, आवळ्याच चूर्ण, तूप व खडिसाखर समप्रमाणात घेऊन सकाळी अनशापोटी घ्यावे.त्वरित आराम पडतो. केसांच्या तक्रारीवर उदा.. केस गळण,पांढरे होणे, कोंडा होणे,टक्कल,केस रूक्ष होणे या सर्वावर आवळा,शंखपुष्पी,जास्वंद, यानीयुक्त तेल केसांना लावावे.. काही दिवसातच केसांची वाढ होते, केस गळण थांबत व केसांचा रंग टिकतो.. व रात्रि शांत झोप येते..तोंड बेचव होऊन मळमळ किंवा उलटी होत असल्यास आवळ्याचा रस व मध याचे चाटण घ्यावे.तोंडास रूचि येते..###आवळा,हिरडा,बेहडा,जांभूळ बी,कडुलिंबाच चूर्ण,गुळवेल व कारली सुकवून त्यांची पूड समप्रमाणात घेतल्यास .. मधुमेह हा आजार आटोक्यात राहतो.. हे चूर्ण सकाळ संध्याकाळ रूग्णाने १-१ चमचा घ्यावं.. नियमित आवळा सेवन केल्यास शरिरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते व त्यामूळे कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी राहून ह्रुदयविकार टाळता येतो..।। आयुर्वेद।।🍈..पोटात जंत झाल्यास एक चमचा आवळ्याचा रस व एक चमचा ओल्या नारळाचे दूध एकत्र करून जेवणापूर्वी, १:५ महिना घेतल्यास जंत पडतात.आव,जुलाब, अपचन या विकारावर,आवळ्याच्या रसात सुंठ पुड घालून ते चाटण दोन्ही जेवणापूर्वी १ महिना घ्यावे.एका आवळ्यातील जीवनसत्व ४० संत्र्याची बरोबरी करतं.एक आवळा रोज खाल्याने रक्तवाहिन्या मजबूत होतात. उन्हामूळे डोळ्यांची आग होते.डोळे थकतात, अश्या वेळी आवळ्याच्या बियांच्या काढ्याने जर डोळे धुतले तर डोळे सशक्त,निरोगी होतात..आवाज बसला असेल तर आवळ्याचे चूर्ण मधात मिसळून घ्या.उचकी किंवा श्वास लागत असेल तर आवळ्याचा रस व पिंपळाचे चूर्ण एकत्र करून घेतात.खरूज झाल्यास आवळकाठी जाळुन ती तेलात खलून त्याचा लेप फोडांवर लावावा..चेहर्यावर सुरकुत्या पडु नये म्हणून आवळकाठी पाण्यात वाटुन ती चेहर्याला लावावी.।। आयुर्वेद।। 🍈 वातामूळे होणार्या सांधेदुखीत एक चमचा आवळा चूर्ण व एक चमचा गुळ एकत्रित करून आल्याच्या रसासोबत घेतल्यास आराम पडतो..आवळा,हिरडा,बेहडा ही द्रव्ये समप्रमाणात घेऊन याचे चूर्ण बनवतात. यालाच त्रिफळा चूर्ण म्हणतात.. हे रोज पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी गाळावे व याने डोळे धुवावे.याने डोळ्याचे तेज वाढतं.. तसेच रात्री झोपतांना गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण घेतल्यास सकाळी शौचास साफ होते.……..नियमितपणे आवळा सेवन केल्यास. त्यात असणार्या रोगप्रतिकार शक्ति मूळे ह्रदय,केस,मांसपेशी व शरिरातील अनेक ग्रंथिंना बळ मिळून माणुस तरूण राहतो. म्हणुनच वार्धक्यावस्था टाळण्यासाठी च्यवनऋषिंनि आवळ्यापासून बनवलेला च्यवनप्राशावलेह सेवन केला व तारुण्यप्राप्त करून घेतले..….। तेव्हा आवळ्याचे हे गुणधर्म बघता सर्वानीच बाराही महिने कोणत्याही स्वरुपात आवळा खाल्लाच पाहीजे…!!!धन्यवाद!!!   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44.   Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

blog

अपुरी झोप व आयुर्वेद

अपुरी झोप व आयुर्वेद नियमित व पुरेशी झोप न घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. नैराश्य व निद्रानाश यांच्यामध्ये परस्परसंबंध असल्याने पुरेशी झोप घ्यावी.झोप सातत्याने कमी होत असणारे 30% लोकांना दीर्घ कालीन गंभीर आजार होतात.उदा. हृदयरोग,हृदयाचे ठोके कमी-जास्त होणे,मधुमेह,उच्चरक्तदाबई.पुरेशी झोप न मिळाल्यास काम करताना निर्णय क्षमता कमी होते. नेहमी रात्री जागरण होत असेल तरचेहरा निस्तेज होतो, त्वचा सुरकुतलेलीदिसते, डोळ्यांखालील काळे वर्तुळ, काळी त्वचा व चेह-यावर – कायमस्वरूपी सुरकुत्या असे बदल होऊन व्यक्ती प्रौढ किंवा वृद्ध/वयस्कर दिसू लागते. योग्य वेळी झोपेचा अभाव असलेल्या पुरुष व स्रीयांमध्ये कामवासना कमी होणे, लैंगिक संबंधातील रस कमी होणे या गोष्टी आढळतात. त्यांच्या शरीरातील टॅस्टोस्टेरॉन (TESTESTERON) ची पातळी कमी होते.झोप कमी झाल्यामुळे स्मरणशक्ति कमी होते, ज्यामुळे वारंवार विस्मरण होते. उपाय : पुरेशी झोप होण्यासाठी आपली दिनचर्या चांगली असावी. सकाळी लवकर उठून योग्य प्रमाणात व्यायाम करावा.पौष्टीक व संतुलित आहार घ्यावा.संध्याकाळी जेवण सूर्यास्ताच्या वेळी करावे.रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करावा. झोपताना मधुर व मनाला आवडेल असे संगीत ऐकावे, रात्री झोपताना केसांच्या (SCALP) मुळाशी ब्राम्ही तेलाने मसाज करावे. रात्री झोपताना तळपाय स्वच्छ धुवून कोरडे करावे व त्याला शतधौत घृत या औषधीचा मलम लावून तळपायांना मसाज करावे. रात्री झोपताना म्हशीचे दूध १ कप + १ चमचा खसखस एकत्र करून पिणे. यामुळे झोप नियमित होते. रात्री झोपताना घरातील जायफळ उगाळावे. उगाळलेले १चमचा जायफळ चाटून घ्यावे. याने देखील झोप पूर्ण होते. अशाप्रकारे पूरेशी झोप घ्यावी व आपले आरोग्य जपावे. धन्यवाद !   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

blog

आमसूलचे ( कोकम ) आरोग्यदायी फायदे

आमसूलचे ( कोकम ) आरोग्यदायी फायदे आपल्या जेवणात चवीसाठी आंबटपणा येण्यासाठीचे काम आमसूल करते.हे चिंचे ईतकेच महत्व असलेले औषध आहे.. म्हणून प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाक घरात असायलाच पाहिजे.आमसूलात लोह,कँलशिअम,फाँस्फरस,प्रथिने, फायबर व क,, जीवनसत्व असतं. आयुर्वेदाप्रमाणे कोकम, हे पित्तशामक,दिपक,पाचक, व ग्राहि गुणधर्माचे आहे.कोकमची साल, स्तंभन,म्हणजेच थांबवण्याचे काम करते, जसे आंव,जुलाब,उलटी 🌟⭐️*.. आमसूलाच्या बीचे तेल काढतात,त्यालाच आमसूलाचे तूप म्हणतात. कोकम पाण्यांत टाकून काढा, पिल्यास,अपचन दूर होते पचनसंस्था उत्तम काम करते.आमसूलात पाणी टाकून कोळ करावा, त्यांत वेलचि, खडिसाखर,टाकून सरबत करावे,हे प्यायल्याने, आम्लपित्त,दाह, तृष्णा,उष्णतेचे विकार दूर होतात.🌟⭐️.. कोकम गर, नारळ दूध,कोथिंबिर, व ताक टाकून सोलकढी पिल्यास, अन्नाचे निट पचन होते.अतिसार, संग्रहणि, रक्ताचे जुलाब, मुरडा हे सर्व कोकम गराचे सरबत घेतल्याने बरे होतात.पोटात कळ येऊन आंव पडत असेल तर, कोकमचे तेल भातात कालवून खावे, 🌟⭐️.. अंगावर पित्त उठले असल्यास, कोकम भिजवलेले पाणी सर्व अंगास लावावे हातापायाची उष्णतेमुळे आग होत असल्यास कोकम उकळलेले तेल लावावे. दाह कमी होतो.हिवाळ्यातील थंडीमुळे ओठ फुटत असतील तर कोकम तेल गरम करून लावावे.ओठ मऊ पडतात. 🌟⭐️.. हिवाळ्यांत शरीराची त्वचा कोरडी पडून भेगा पडतात.तिथे कोकम तेल लावावे.रोजच्या कोकम वापरामुळे आतडी मजबुत होतात.मूळव्याध असल्यास दह्यावरच्या निवळीत कोकम कल्क मिसळून प्यावे,रक्त येणे बंद होते. 🌟⭐️. उन्हाळ्यांत बाहेर पडण्याच्या आधी, कोकम सरबत प्यावे.ऊन बाधत नाही..वजन कमी करण्यासाठी ४०० ग्रँम कोकममध्ये ४ लिटर पाणी घालून उकळावे व एक लिटर करावे. मग सकाळ, संध्याकाळ १०० ml. प्यावे.. वजन कमी होते.. 🌟⭐️.. यांत व्हिटँमिन सी. विपुल आहे.. पोटँशिअम, मँग्नेशिअम खूप असल्याने ह्रदयविकार होत नाहीब्लडप्रेशर नाँर्मल राहतं.सर्व प्रकारचे फुफ्फुसाचे आजार, क्षयरोग,कंठरोग याच्या नियमित सेवनाने बरे होतात. 🌟⭐️.. रोजच्या आहारात कोकमचा वापर जर कायम ठेवला तर,अग्निमांद्य, अपचन,अरूचि,पोट तडिस लागणे हे विकार होत नाहीत…🌟⭐️🌟⭐️🌟…. *आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

blog

भिजवलेल्या सैंधव मिठाचे महत्त्व जाणून घ्या!

भिजवलेल्या सैंधव मिठाचे महत्त्व जाणून घ्या! मॅग्नेशियम सल्फेट यालाच सैंधव मीठ म्हणून ओळखले जाते. ते मीठ पाण्यात मिसळले असता मॅग्नेशियम आणि सल्फेट आयर्न सोडते. जे मानवी त्वचेद्वारे सहजपणे शोषले जाऊ शकते. याच्या 20 ग्रॅमच्या पॅकेटसाठी 10 रुपये लागतात. सैंधव मिठाचे काही फायदे पुढीलप्रमाणे… शरीराच्या वेदनांपासून मुक्तता: भिजवलेल्या सैंधव मिठामुळे शरीर आणि सांध्यातील वेदना कमी होण्यास मदत होते. मॅग्नेशियममुळे शरीरात स्नायू सुखावतात. त्यामुळे महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा तुम्ही अगदी बाथटब घेण्याची गरज नाही. सैंधव मीठ असलेल्या पाण्यात गुडघ्यापर्यंत पाय ठेऊ शकता. ज्येष्ठ नागरिकांमध्ये साधी आणि गुडघेदुखीचा त्रास जास्त असतो. तर 20 ते 30 या वयोगटातील तरुणांकडून चुकीच्या आहार पद्धतीमुळे हाडांच्या समस्या निर्माण होतात. विश्रांती आणि पुनर्प्राप्ती: अनेक अ‍ॅथलिट आपल्या प्रशिक्षणानंतर सेंधव मीठ घातलेल्या बाथ टबमध्ये बाथ घेतात. सैंधव मीठ सौंदर्य देणारे दाहक विरोधी आणि स्नायू शिथिल करणारे आहे. त्यामुळे खेळाडूंच्या प्रशिक्षणानंतर किंवा शस्त्रक्रियेमधून बऱ्या झालेल्या रुग्णांना सैंधव मीठाच्या अंघोळीने वेदना कमी होतात. झोपेसाठी मदत करते: अनेक लोक झोपेपूर्वी सैंधव मीठाच्या पाण्याने आंघोळ करतात. या लोकांना चांगली झोप लागते. दरम्यान त्यांना मिळालेल्या मॅग्नेशियममुळे निरोगी पातळी वाढते. उती, सांधे आणि स्नायू मध्ये थकवा कमी होतो. फिट असल्यास फायदेशीर: अनेक प्रौढांना किंवा लहान मुलांना फिट येण्याचा त्रास होतो. ज्यामध्ये सैंधव मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने यात सुधारणा करण्यास मदत होते. डीटॉक्सीफिकेशन: हे मानवी शरीरासाठी महत्त्वाचे आहे. वजन कमी करणे, निरोगी राहणे, रोग प्रतिकारकशक्ती वाढवणे. यासाठी सैंधव मीठ यामुळे होणारे शरीराचे डीटॉक्सीफिकेशन फायदेशीर ठरते. डिहायड्रेशन टाळण्यासाठी देखील सैंधव मिठाचा वापर करता येतो. शरीरातील आणि त्वचेतील पदार्थ बाहेर टाकण्यास सुरुवात होते. यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 ते 3 कप सेंधव मीठ घालून 15 ते 45 मिनिटांपर्यंत पाय भिजवून ठेवल्यास फायदा होतो. ताण: मॅग्नेशियममुळे स्नायूंना आराम मिळतो. स्नायू शिथिल होतात. त्यामुळे मेंदूला देखील आराम मिळतो. तर ताण तणाव कमी होतो. सैंधव मिठामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडल्याने शरीराला आराम मिळून ताण-तणाव दूर होण्यास मदत होते. मिठाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास सूज आणि दाह कमी होतो. शरीरात मॅग्नेशियममुळे स्नायु कार्यरत होतात. जसे हृदयाचे आरोग्य, रक्तदान, मेंदूचे आरोग्य, न्युरोट्रान्समीटर, न्यूरोलॉजिकल फंक्शन केस, त्वचा, यकृत, मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. सैंधव मिठाच्या अंघोळीमुळे पायाचा ताठपणा कमी होतो. सैंधव मिठामुळे शरीराला मिळणाऱ्या मॅग्नेशियम मुळे चयापचय क्रिया सुधारते. हृदयाच्या आरोग्यासाठी मॅग्नेशिअम महत्त्वाचे असते. तसेच *व्हिटॅमिन D3 व्हिटॅमिन K2 * मिळाल्याने शरीर प्राप्त करते. सैंधव मीठ भिजवताना अशी काळजी घ्या : जर तुम्हाला कमी रक्तदाब असेल तर सैंधव मिठाचे पाणी वापरू नका. कारण यामुळे रक्तदाब कमी होतो. तसेच मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्यास सैंधव मिठाचा वापर करू नये, मूत्रपिंड विषयी समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सैंधव मिठाचा वापर करा. अशा पद्धतीने सैंधव मीठ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे अन्नाद्वारे किंवा आंघोळीद्वारे सैंधव मीठ घेणे कॅल्शियम मिळवण्यास मोठा स्रोत उपलब्ध करतो. @@@@आयुर्वेदिक तज्ञ@@@@: वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 हेल्पलाइन नं: 779677500094225585099822634478 Website : www.infertilityayurved.in 📚 👨‍⚕ जय आयुर्वेद अधिक माहीतीसाठी खालील Group Join करा. https://chat.whatsapp.com/H1AQ1UtiZO2ImLyeiECHXC Related Articles केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)

Scroll to Top