अपुरी झोप व आयुर्वेद
अपुरी झोप व आयुर्वेद नियमित व पुरेशी झोप न घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. नैराश्य व निद्रानाश यांच्यामध्ये परस्परसंबंध असल्याने पुरेशी झोप घ्यावी.झोप सातत्याने कमी होत असणारे 30% लोकांना दीर्घ कालीन गंभीर आजार होतात.उदा. हृदयरोग,हृदयाचे ठोके कमी-जास्त होणे,मधुमेह,उच्चरक्तदाबई.पुरेशी झोप न मिळाल्यास काम करताना निर्णय क्षमता कमी होते. नेहमी रात्री जागरण होत असेल तरचेहरा निस्तेज होतो, त्वचा सुरकुतलेलीदिसते, डोळ्यांखालील काळे वर्तुळ, काळी त्वचा व चेह-यावर – कायमस्वरूपी सुरकुत्या असे बदल होऊन व्यक्ती प्रौढ किंवा वृद्ध/वयस्कर दिसू लागते. योग्य वेळी झोपेचा अभाव असलेल्या पुरुष व स्रीयांमध्ये कामवासना कमी होणे, लैंगिक संबंधातील रस कमी होणे या गोष्टी आढळतात. त्यांच्या शरीरातील टॅस्टोस्टेरॉन (TESTESTERON) ची पातळी कमी होते.झोप कमी झाल्यामुळे स्मरणशक्ति कमी होते, ज्यामुळे वारंवार विस्मरण होते. उपाय : पुरेशी झोप होण्यासाठी आपली दिनचर्या चांगली असावी. सकाळी लवकर उठून योग्य प्रमाणात व्यायाम करावा.पौष्टीक व संतुलित आहार घ्यावा.संध्याकाळी जेवण सूर्यास्ताच्या वेळी करावे.रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करावा. झोपताना मधुर व मनाला आवडेल असे संगीत ऐकावे, रात्री झोपताना केसांच्या (SCALP) मुळाशी ब्राम्ही तेलाने मसाज करावे. रात्री झोपताना तळपाय स्वच्छ धुवून कोरडे करावे व त्याला शतधौत घृत या औषधीचा मलम लावून तळपायांना मसाज करावे. रात्री झोपताना म्हशीचे दूध १ कप + १ चमचा खसखस एकत्र करून पिणे. यामुळे झोप नियमित होते. रात्री झोपताना घरातील जायफळ उगाळावे. उगाळलेले १चमचा जायफळ चाटून घ्यावे. याने देखील झोप पूर्ण होते. अशाप्रकारे पूरेशी झोप घ्यावी व आपले आरोग्य जपावे. धन्यवाद ! * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles Makar Sankranti:- Benefits of Sesame Seed (Til) (संक्रांत- तिल के फायदे) LOW AMH – AYURVEDIC PERSPECTIVE | Dr. Avinash Deore (Infertility Specialist) Navratri Fasting Importance in Ayurveda | Dr. Avinash Deore (Infertility Specialist)



