infertilityayurved

Home Remedies

Home Remedies

केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय

केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय रोज काही प्रमाणात केस गळणे हे सामान्य आहे,परंतु जेव्हा केस हे गुच्छांमध्ये गळणे सुरू होते, तेव्हा याचा अर्थ पोषक तत्वांची कमतरता किंवा अयोग्य जीवनशैली जसे कि जास्त ताण, अपुरी झोप किंवा धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयी असतात,तसेच हार्मोनचे असंतुल.बऱ्याच वेळा, आपल्या केसांची आणि त्वचेची स्थिती आपल्या आतील शरीराची स्थिती दर्शवते. म्हणूनच, केस गळती रोखण्यात पोषण महत्वाची भूमिका बजावते. केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय क्र. १ :-* कढीपत्ता:- हा भारतीय स्वयंपाक घरातील एक सामान्य मसाला आहे, जो आरोग्यासाठी विशेषतः केसांसाठी उत्तम आहे. कढीपत्ता हा बीटा-कॅरोटीन,प्रथिने, लोह,कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरसचा समृद्ध स्रोत आहे. कडीपत्त्यामुळे केस गळती रोखली जाऊन अकाली पांढरे होण्यापासून देखील त्यांचा बचाव होतो.केसांच्या आरोग्यासाठी कडीपत्त्याचा वापर आहारात तर महत्त्वाचा आहेच परंतु, त्या व्यतिरिक्त तुम्ही कडिपत्यांपासून खालीलप्रमाणे वेगवेगळे हेअर मास देखील बनवून लावू शकता. १) कढीपत्ता आणि दही हेअर मास्क:-कढीपत्त्याची काही पाने वाटून घ्या. त्यात केसांच्या लांबीनुसार दही घाला व हा मास्क केसांना लावा हा मास्क २० ते ३० मिनिटे ठेवून केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा मास्क केसांना लावा. २) कढीपत्ता कांदा हेअर मास्क:-केसांच्या लांबीनुसार कढीपत्त्याची पाने आणि कांदा यांची पेस्ट करुन घ्यावी. तयार मास्क केसांना लावावा व साधारण ३० मिनिटांनंतर धुऊन टाकावा. तुम्हाला तुमचे केस मुलायम लागतील. जर कांद्यामुळे तुम्हाला तुमचे केस अधिक कोरडे वाटत असतील तर तुम्ही कांद्याचे त्यातील प्रमाण कमी करु शकता . ३) कढीपत्त्याचे तेल:-कढीपत्त्याचे तेल बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला लागेल नारळाचे तेल. नारळाचे तेल गरम करुन घ्यावे.त्यात कढीपत्त्याची पाने टाकावीत व गॅस बंद करावा. नंतर तेलात मेथीचे दाने,जास्वंदाच्या पाकळ्या व एक चमचा अहळीव टाकावे आणि मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे.दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण वस्त्रगाळ करून काचेच्या बाटलीत साठवावे.आठवड्यातून दोनदा हे तेल केसांना लावावे.१५ दिवसात तुमच्यात केसांमध्ये झालेला फरक जाणवेल. केस गळण्याची कारणे 1) – शरीरात IRON कमी होणे.शरीरात Calcium कमी होणे. 2) दररोज डोक्यावरुन अंघोळ करणे. 3) केसांसाठी जास्त shampoo किंवा chemical products जास्त वापरणे. उपाय – 1) आहारात Iron आणि Calcium युक्त पदार्थ घेणे, जसे- खजुर,मनुका, अक्रोड, हिरव्या पालेभाज्या, दूध यांचा आहारात समावेश असावा. 2 ) केस आठवडयातून 2 वेळा धूणे व केसांचे तेल दररोज रात्री लावणे. 3 ) केस बाहेर जाताना बांधणे त्याने केस खराब होत नाहीत व प्रदूषणाचा बाईट परिणाम होत नाही.धन्यवाद!!!! * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर.पुणे- निगडी ।बाणेर । मोशी. Related Articles मूळव्याध वर घरगुती उपाय वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल

Home Remedies

मूळव्याध वर घरगुती उपाय

मूळव्याध वर घरगुती उपाय मूळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वाराजवळ असलेला / असलेले कोंब. हे कोंब गुदद्वाराच्या आत किंवा त्याच्या बाजूनेही असू शकतात. हे कोंब म्हणजे मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या असतात. होऊ नये म्हणून काय करायला हवेभरपूर पाणी, दररोज व्यायाम, शौचास जोर न करणे, एका जागी जास्त वेळ न बसणे, नेहमी वजनदार गोष्टी न उचलणे या गोष्टी पाळल्या तर मूळव्याध होणे टाळता येते. आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढवा, जेवणाच्या वेळा नियमित ठेवा, अतिरिक्त वजन कमी करा, मसालेदार पदार्थ, मांसाहार व अतियोग टाळा, मद्यपान किंवा धूम्रपान करू नका, रात्रीचे जागरण टाळा म्हणजे मूळव्याधीपासून दूर राहता येईल. आहारात तंतूंचा भरपूर समावेश व मल नरम राहील अशी योजना आवश्‍यक असते. आहार :-हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. लोणी खावे. ताजे ताक प्यावे.(आंबट नव्हे.) रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते. सुरणाची भाजी आठवड्यात एकदा तरी खावी,जेवणात हिरव्या भाज्या, पाले भाज्या, ब्राउन राईस, दूध, सुजी इत्यादीचे सेवन करा. जेवणात तांदूळ, गहु,यव,ज्वारी,दूधी,पडवळ,आंबटचुका,घोसाळी,मुग,तुर,सुंठ, मनूका, आवळा याचा वापर करा. हे खाऊ नका मका,उडीद,वाल,पावटे,शेंगदाणे,तळलेले पदार्थ,लोणची ,पापड, मास विशेषतः बीफ रेड मीट सेवन टाळा.घरगुती उपाययोजना◆रक्तस्राव असल्यास निरंजनचे फळ आणून ते पाउण पेला पाण्यात रात्री भिजू घालावे.सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करुन ते पाणी प्यावे.◆इसबगोल सकाळी भीजत ठेवून रात्री ते पाणी प्यावे.◆कोरफड व लिंबू रस एकत्रित लावल्यास तात्काळ रक्त थांबेल.उपडे झोपून हे मिश्रण आत सरकवावे.◆कासिसादी तेलाचा बोळा भिजून या जागेत ठेवा.◆दोन चमचे दुर्वा रस कपभर गायीच्या दुधात उकळून हे मिश्रण गाळून घेतल्यास फायदा होतो.◆डाळींबाच्या सालीचे चुर्ण एक तास भीजत घालून नंतर ताक व जीरपूड+ सैधव घालून रोज प्या.◆मुळ्याच्या रसात लिंबू व सैधव घालून प्या.◆चमचाभर जीरेपूड, धनेपावडर, ओवा अर्क,बडीशेप अर्क चमचाभर व पिव्वर गुलकंद ग्लासभर पाण्यात घालून प्या.◆चमचाभर लोण्यात नागकेशर चुर्ण टाकून दोन-तीन वेळा घ्या.◆कोरफड गर व चमचाभर मध,चमचाभर दुर्वाचा रस व तूप,एरंडेल यांचे क्रीम तयार करुन त्या जागेवर लावा.वरती कापूस लावा.थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा,म्हणजे छान मलम तयार होईल.◆मोड दुखत असेल तर,सुजला असेल,बाहेर आला असेल तर,विस्तवावर खारकेचे चुर्ण टाकून ती वाफ घ्या.मुळव्याध नियंत्रणासाठी अस्तित्वात असलेल्या उपचार पध्दती.◆मूळव्याधीच्या मुळाशी छेद घेऊन काढून टाकले जाते. यालाच हिमोरायडेक्‍टॉनी म्हणतात.◆मूळव्याधीचे कोंब स्टेपलर गनमध्ये घेऊन गन शूट केली जाते. या सर्जरीमध्ये मूळव्याध कट होण्याचे व स्टेपल होण्याचे कार्य एकाच वेळी होते.◆मूळव्याधीच्या ठिकाणी स्क्‍लेरोसंट इंजेक्‍शन टोचले जाते. वेदनाविरहित उपचार पद्धती आहे. रुग्णास ॲडमिट राहावे लागत नाही व मूळव्याधीमधील रक्तस्राव ट्रीटमेंटनंतर एक-दोन दिवसांत बंद होतो.◆डॉपलर गाइडेड हिमोराईड (मूळव्याध) आर्टरी (रक्तवाहिनी) लायगेशन (बांधणे) या उपचार पद्धतीमध्ये मूळव्याधीचा रक्तपुरवठा बंद केला जातो.◆मूळव्याधीच्या कोंबावर लेझर किरणांचा मारा करून रक्तवाहिन्या गोठवल्या जातात. यामुळे मूळव्याधीमधील रक्तस्राव बंद होतो◆या उपचार पद्धतीमध्ये मूळव्याधीचा रक्तस्राव बंद करण्यासाठी मूळव्याधीच्या कोंबांना नायट्रस ऑक्‍साइड वायूचा वापर करून गोठविले जाते यालाच फ्रायोसर्जरी असे म्हणतात.◆पाइल्स गनद्वारा मूळव्याधीच्या मुळाशी रबरबॅंड लायगेशन करुन रबरबँड बसविला जातो. मूळव्याधीच्या कोंबाचा रक्तपुरवठा बंद होऊन मूळव्याध निर्जीव होऊन गळून पडते.◆मूळव्याधीच्या मुळाशी क्षारसूत्र बांधले जाते. या चिकित्सेमध्येही रक्तपुरवठा बंद होऊन मूळव्याध निर्जीव होऊन गळून पडते. भगंदर या व्याधीमध्ये क्षारसूत्र चिकित्सेचा विशेष फायदा होतो. या उपचार पद्धतीनंतर भगंदर पुन्हा उद्‌भवण्याचे प्रमाण नगण्य आहे.   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिककोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Related Articles केस गळतीवरती घरगुती प्रभावी उपाय वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल

Home Remedies

वजन व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल

* संध्याकाळी लवकर सूर्यास्ताच्या आत किंवा निदान 7 PM पर्यंत जेवावे. (त्यासाठी सकाळी 8 च्या आत हलका नाश्ता -पेज,मउभात,सूप इत्यादी किंवा नाष्टा न करणे व दुपारचे जेवणच 10.30 ते11 पर्यंत घेणे आवश्यक) * संध्याकाळी जेवणानंतर कोणतेही द्रवपदार्थ पाणी,कॉफी,चहा,कॉल्डड्रिंक juice,ice cream इत्यादी न घेणे . लवकर जेवल्यामुळे भूक लागल्यास लाह्या,कुरमुरे,खाकरा, राजगिरा लाडु असे कोरडे पण हलके पदार्थ खावे. *तहान नसताना,जेवणानंतर लगेच, सूर्यास्तानंतर,उगाच अनावश्यक पाणी पिऊ नये.जेवणाच्या आधी पाणी पिल्याने वजन कमी होते. *पाणी नेहमी बसून,भांड्याला तोंड लावून,चहाप्रमाणे घोट घोट प्यावे.उभ्याने बाटलीने गटागटा पाणी पिऊ नये. *उन्हाळ्यात साधे व हिवाळ्यात कोमट किंवा गरम पाणी तहानेनुसार प्यावे.ऋतूनुसार पाण्यात औषधी पदार्थ टाकावे . उदा -उन्हाळ्यात धणे ,जिरे घालून उकळलेले पाणी किंवा पावसाळ्यात सुंठ,नागरमोथा घालून उकळून गाळून घेतलेले पाणी *पोट चेपले जाईल असे व्यायाम करावे. सूर्यनमस्कार,साष्टांग नमस्कार, लोटांगण, प्रदक्षिणा,योगासने(बसून, उभे राहून,पोटावर झोपुन व पाठीवर झोपून ) इत्यादी सर्व प्रकारची योगासने करावी. *चालणे,धावणे,नृत्य,पोहोणे,टेनिस, बॅडमिंटन इत्यादी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी करावे. कार,लिफ्ट,सोफा,शौचाच्या वेळी कमोड यांचा वापर कमीत कमी करावा. खाली बसणे, जिने चढणे,पायी चालणे,हाताने जास्त कामे करणे. उदा- कपडे धुणे,पिळणे,लादी पुसणे,बागकाम,कणिक मळणे,नारळ खरवडणे इत्यादी करावे. *सतत एका जागी बसणे टाळावे, मध्ये उठून थोडे फिरावे, stretching करावे. *आहारात गहू,बेकरी पदार्थ, पाव,बिस्कीट,केक,मैदा कमीत कमी वापरावा. ज्वारी,बाजरी,नाचणी भाकरी किंवा फुलके खावे. *तांदूळ 1वर्ष जुना,कमी पॉलिशचा,स्थानिक जातीचा वापरावा. भात उघड्या पातेल्यात बनवलेला,पेज काढून टाकलेला खावा.अशा भाताने वजन,चरबी,शुगर वाढत नाही. नवीन तांदूळ,कुकरचा भात,बासमती सारखे पचायला जड तांदूळ वापरले तर मात्र वजन वाढू शकते. * जर्सी गायीचे दूध,चीज,बटर,दही,योगर्ट, चॉकलेट इत्यादी बंद करावे. देशी गाईचे (A2मिल्क) (सकाळी ) , देशी गाईचे तूप (जेवताना गरम भात किंवा भाकरीला लावून) , ताक (दुपारी जेवताना) घ्यावे. * ताज्या भाज्या विशेषतः फळभाज्या (पालेभाज्या कमी) व season नुसार फळे नाश्त्यामध्ये व जेवणात खावी .फळांचे juice व अन्य पदार्थ नको. *मधल्या खाण्यासाठी सर्व प्रकारच्या लाह्या,उकडलेले मूग, काळ्या मनुका (black resins), जर्दाळू (apricot),खारीक, लाह्यांचा किंवा कुरमुऱ्याचा चिवडा, खाकरा,चिकी,ताजे घरी बनवलेले भाज्यांचे सूप घ्यावे. *पुदिना,आले,लसूण, कांदा, मिरे,जिरे,दालचिनी,हळद या मसाल्यांचा भरपूर वापर करावा. * ब्रॉयलर प्रकारचे,फ्राईड,फ्रोझन नॉनव्हेज टाळावे. नॉनव्हेज कमीच खावे शक्य असल्यास पूर्ण टाळावे . *जेवणानंतर 10 मिनिटे सावकाश फेऱ्या माराव्या. *आंघोळ करताना साबण वापरू नये. त्रिफळा चूर्ण,शिकेकाई चूर्ण, मसुर डाळीचे पीठ असे पदार्थ साबणा ऐवजी वापरावे.चरबी जास्त असणाऱ्या ठिकाणी थोडे घासून लावावे.यामुळे चरबी कमी होते. पंचकर्मातील मसाज(त्रिफळा तेल) व उद्वर्तन उपचार वजन कमी होण्यास उपयुक्त आहेत. सोबतच स्वेदन (स्टिमबाथ ) व लेखन बस्ती अनावश्यक चरबी कमी करतात.   * आरोग्य तज्ज्ञ * वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु) वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु) श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44 Visit- https://infertilityayurved.in/  

Scroll to Top