Let’s learn how to prevent chikungunya | Dr. Avinash Deore

चिकनगुनिया

पावसाळ्यात साथीचे आजार होतात, सध्या सगळी कडे व्हायरल तापाची साथ सुरु आहे, तिच्यापासून बचाव कसा करायचा ते जाणून घेऊ.
चिकनगुनिया हा असा व्हायरस आहे ज्याच्या शरीरात येण्यामुळे ताप येतो. चिकनगुनिया चे मुख्य लक्षण हे ताप (temperature) आहे. हा व्हायरस सर्वात आधी तंजानिया येथे आढळून आला होता. जेव्हा त्या ठिकाणी हा वायरस आढळून आला त्यानंतर त्यावर तिथे रिसर्च करून त्याला चिकनगुनिया असे नाव देण्यात आले.

चिकनगुनिया हा काही जास्त मोठा आजार नाही किंवा तो नीट होणारच नाही असे देखील नाही. याचे अनेक असे उपाय आहेत ज्यामुळे हा आजार ठीक होऊ शकतो. कुठलाच आजार मोठा नसतो फक्त आपले सकारात्मक विचार आणि त्या आजाराविरुद्ध लढण्याची ताकद या दोनच गोष्टी आपल्याला आजार पळवून लावू शकतात. हा आजार एवढा घातक नाही की ज्यामुळे आपला मृत्यू होऊ शकेल. सामान्य व्यक्ती या आजारातून पूर्णपणे बरा होऊ शकतो, फक्त थोडा वेळ द्यावा लागतो.

चिकनगुनियाची कारणे (Chikungunya Causes)

या आजाराचे मुख्य कारण पहिले तर हा आजार मच्छराच्या चावल्यामुळे होतो. हे मच्छर आपल्या आसपास साठलेल्या घाणीमुळे तयार होतात. यामध्ये हजारो डास तयार झालेले असतात, त्यामधील काही अतिशय विषारी असतात. चिकनगुनिया हा आजार वेळेस एडेस एलबोपिक्टस (Aedes Albopictus) तसेच एडेस इज्यप्ती (Aedes Aegypti) नावाच्या मच्छरने चावल्यास होतो. हा व्हायरस मुख्यता जनावरांमध्ये किंवा पक्षांमध्ये असतो व तिथूनच आजूबाजूच्या परिसरात पसरतो.

चिकनगुनिया ची लक्षणे (Symptoms of Chikungunya)

चिकनगुनिया मध्ये एक विशिष्ट प्रकारचा ताप व्यक्तीला येतो . परंतु सुरुवातीच्या काळामध्ये असे काही लक्षणे आढळून येतात जे पुढील प्रमाणे आहेत.

>>सुरुवातीच्या काळामध्ये हात आणि पायामध्ये खूप वेदना होतात. या वेदना मुख्यत्वे सांध्यांमध्ये जास्त होतात, याचबरोबर डोकेदुखी देखील वाढते.
रुग्णाला थंडी वाजून येते व त्यानंतर तीव्र असा ताप येतो. हा ताप पाच-सहा दिवस असाच कमी जास्त होत राहतो. ताप 102 ते 103 डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतो.

>> या व्हायरस ने मुटेशन केल्यामुळे नाक लाल होणे ,नाकावर काळा चट्टा उठणे ,चेहऱ्या वर रॅश येणे हि लक्षणे देखील अढळून येतात .

>>हातापायांना सूज येते व खूप वेळा शरीरावरती दाने दाने (Spots) आढळून येतात.या आजाराची लक्षणे कमीत कमी दहा ते बारा दिवस राहतात. या आजाराचे बरेच पेशंट पाहिल्यानंतर असे लक्षात आले की सुरुवातीच्या सहा दिवसांमध्ये या आजाराचा खूप जास्त त्रास होतो. नंतरच्या पाच सहा दिवसांमध्ये ताप हळूहळू कमी होऊन आजार बरा होतो.

>>तापाचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे या आजारात शरीरामधील पाचनक्रिया(Metabolism) खूप कमी होते,त्यामुळे खाल्लेले पचत नाही व त्यामुळे अशक्तपणा येण्याची शक्यता असते.

आयुर्वेदिक उपाय

>> वरील रुंगांमध्ये ऍलोपथ्य सोबत आयुर्वेदिक उपचार देखील त्वरित सुरु करावे ,त्या मध्ये गुळवेल चा काढा सकाळ ,संध्याकाळ घेणे. ताप आल्यास
महासुदर्शन काढा ३ चमचे सकाळी संध्याकाळ आणि रात्री घेणे .

>>सोबत सांधे दुखी चा तीव्र त्रास असल्यास अमृतारिष्ट हे औषध ३-३ चमचे ३ वेळा घेणे.

>>सोबत गरम पाण्याच्या पिशवी ने सर्व सांधे शेकून घेणे,आहारामध्ये पचण्यास हलका आहार घेणे .

>> या काळामध्ये आराम करणे अपेक्षित आहे, लक्षणांचा तीव्रतेनुसार आयुर्वेदिक तज्ञांकडून सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार सुरु करावे .

अशा पद्धतीचे ५०० च्या वर रुग्णांना आम्ही वेदने मधून मुक्त केले आहे

https://chat.whatsapp.com/D2JkOyBrBFk94OL1veCsNZ

।।हर घर आयुर्वेद।।
।।हर दिन आयुर्वेद।।

आरोग्य तज्ज्ञ

वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)
वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु)

श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक
कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44
श्रीसाई आयुर्वेदिक पंचकर्म रूग्णालय.F1-बिल्डिंग, फ्लॅट-B3. दुसरा मजला, शिव साडीच्या वर, सेक्टर-०९. हॉटेल शबरी जवळ, वाशी-४००७०३, नवी मुंबई.
शाखा- मुंबई- वाशी । दादर.
पुणे- निगडी ।बाणेर । मोशी.

हेल्पलाइन नं:

7796775000
9422558509
9822634478
https://youtu.be/oopuj-isLZkhh