चांगला आहार हाच प्रमूख चांगल्या आरोग्याचा स्रोत आहे. मग त्या अन्नात अश्या गोष्टि असायला पाहिजे कि, ज्याने ते जेवण रूचकर व चवदार सोबत, पौष्टिक, बलदायी, आरोग्यदायी असले पाहिजे.
तेव्हा आपले महाराष्ट्रियन जेवण या अनुषंगाने अतिशय उत्तम स्रोत आहे.
##.. आपल्याला जेवणातून,पिष्टमय पदार्थ, प्रोटिन्स, स्निग्ध पदार्थ (वसा, फँटस् तूप, तेल, मेद) विटामिन्स, आणि क्षार मिळायला हवेत…. आणि.. आयुर्वेद म्हणते कि, जेवणांत गोड, आंबट, तिखट, खारट, कडू, तुरट, असे षड(सहा) रस मिळायला हवेत,तर ते परिपूर्ण जेवण असतं
## आपले मराठी जेवण शास्रशुद्ध असते. वरणांतील डाळ प्रोटिन्सची पूर्तता करते. यात घातलेला गूळ लोह देतो. तर चिंचेचा कोळ लोह पचवायला मदत करतो….. भात, पोळी, भाकरी, यांतून पिष्टमय पदार्थ मिळतात. त्यातून शरिराला उर्जा मिळते.
## वरणभातावर पडणारी साजूक तूपाची धार, स्निग्धता देऊन आतडे नरम ठेवते. आणि अन्न पचवण्यास मदत करते… वेगवेगळ्या भाज्यांमधून मिळणारे मिनरल्स, आणि खनिजे पोषक ठरतात.
## थाळीतले डावीकडचे पदार्थ मीठ, लिंबाची फोड,पंचामृत,मिरचीचा ठेचा, थोडी कोशिंबिर, हे सर्व तोंडाला रस सुटून जेवण पचवतात.
## … लिंबू – Vit C ची.पूर्ती करते, तर हिरवी मिरची प्रतिकारशक्ती वाढवते… जंतूनाशक म्हणून..
## पंचामृतातले तीळ, शेंगदाणे, खोबरे, वंगण म्हणून उपयोगी ठरते. आणि स्निग्धता देते. अधे मध्ये जिभेला जिवंत करायला या डाव्या बाजूला असणार्या पदार्थाचा उपयोग ठरतो….. मिठ मात्र चवीचे खायचे..
## मसाले भातातले काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे शरिराला उर्जा देतात. तर मसाले सर्दि, कफ, विकारांवर अंकूश ठेवतात…. पापडातला उडिद बळ देतो,ताकद देतो…. वाटीतला मठ्ठा, ताक हे मन प्रसन्न करून मानसिक ताण कमी करते..
…. ## पातळभाजीतले शेंगदाणे, खोबरे व फोडणीतला… हिंग..अन्नाचे पचन करण्यास मदत करतो… सोबत.. मेतकूट म्हणजे अनेक डाळींचा संगम, ज्यामुळे प्रोटिन मिळून ताकद वाढते.
## . आणि सर्वात शेवटी गोड म्हणून शिरा, श्रीखंड, आमरस, हे तृप्ती देउन, मानसिक ताण, कमी करते.
## मग मात्र हे आकंठ, जेवण पचावे म्हणून व त्यासाठी कँलशिअमसहित,, अनेक द्रव्ये उपलब्ध व्हावीत म्हणून। ( कात, चूना, सुपारि, लवंग, वेलचि, खोबरे, गुलकंद,) असे अनेक पदार्थ घातलेला ,, त्रयोदशगुणि,, विडा हा हवाच खायला !!! …
## अन्न हे परब्रम्ह, उदरभरण नव्हे हे जाणिजे यज्ञकर्म,…..🌾🌾🍀🌾
* आरोग्य तज्ज्ञ *
वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)
वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु)
श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक
कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44
शाखा- मुंबई- कोपरखैरणे । दादर.
पुणे- निगडी ।बाणेर । मोशी.