नियमित व पुरेशी झोप न घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. नैराश्य व निद्रानाश यांच्यामध्ये परस्परसंबंध असल्याने पुरेशी झोप घ्यावी.
झोप सातत्याने कमी होत असणारे 30% लोकांना दीर्घ कालीन गंभीर आजार होतात.
उदा.
हृदयरोग,हृदयाचे ठोके कमी-जास्त होणे,मधुमेह,उच्चरक्तदाबई.
पुरेशी झोप न मिळाल्यास काम करताना निर्णय क्षमता कमी होते.
नेहमी रात्री जागरण होत असेल तर
चेहरा निस्तेज होतो, त्वचा सुरकुतलेली
दिसते, डोळ्यांखालील काळे वर्तुळ, काळी त्वचा व चेह-यावर – कायमस्वरूपी सुरकुत्या असे बदल होऊन व्यक्ती प्रौढ किंवा वृद्ध/वयस्कर दिसू लागते.
योग्य वेळी झोपेचा अभाव असलेल्या पुरुष व स्रीयांमध्ये कामवासना कमी होणे, लैंगिक संबंधातील रस कमी होणे या गोष्टी आढळतात. त्यांच्या शरीरातील टॅस्टोस्टेरॉन (TESTESTERON) ची पातळी कमी होते.
झोप कमी झाल्यामुळे स्मरणशक्ति कमी होते, ज्यामुळे वारंवार विस्मरण होते.
उपाय :
पुरेशी झोप होण्यासाठी आपली दिनचर्या चांगली असावी. सकाळी लवकर उठून योग्य प्रमाणात व्यायाम करावा.पौष्टीक व संतुलित आहार घ्यावा.संध्याकाळी जेवण सूर्यास्ताच्या वेळी करावे.रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करावा.
झोपताना मधुर व मनाला आवडेल असे संगीत ऐकावे, रात्री झोपताना केसांच्या (SCALP) मुळाशी ब्राम्ही तेलाने मसाज करावे. रात्री झोपताना तळपाय स्वच्छ धुवून कोरडे करावे व त्याला शतधौत घृत या औषधीचा मलम लावून तळपायांना मसाज करावे.
रात्री झोपताना म्हशीचे दूध १ कप + १ चमचा खसखस एकत्र करून पिणे. यामुळे झोप नियमित होते.
रात्री झोपताना घरातील जायफळ उगाळावे. उगाळलेले १चमचा जायफळ चाटून घ्यावे. याने देखील झोप पूर्ण होते.
अशाप्रकारे पूरेशी झोप घ्यावी व आपले आरोग्य जपावे.
धन्यवाद !
* आरोग्य तज्ज्ञ *
वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)
वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु)
श्रीसाई आयुर्वेदिक क्लिनिक
कोहिनूर आर्केड, पहिला मजला, बॉम्बे-पुणे हायवे, टिळक चौक, सेक्टर क्रमांक 24, लँडमार्क: ओव्हरब्रिज जवळ बॉम्बे पुणे हायवे, पुणे-44